हरिश्चंद्र गडावर 17 ट्रेकर्स अडकले!

कल्याण : प्रसिद्ध हरिश्चंद्र गडावर 17 ट्रेकर्स अडकले आहेत. कोकणकड्यापासून 800 फूट खाली ट्रेकर्स अडकले असून, ठाणे जिल्हा प्रशासनाच्या वतीने ट्रेकर्सना सुरक्षित स्थळी आणण्यासाठी बचावकार्य सुरु करण्यात आले आहे. काल संध्याकाळची (25 नोव्हेंबर) ही घटना आहे. हरिश्चंद्र गडावर ट्रेकिंगसाठी एकूण 30 जण गेले होते. हरिश्चंद्र गडावरुन खाली उतरताना कोकणकड्यापासून 800 फूट खाली यातील 17 जण […]

हरिश्चंद्र गडावर 17 ट्रेकर्स अडकले!
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:58 PM

कल्याण : प्रसिद्ध हरिश्चंद्र गडावर 17 ट्रेकर्स अडकले आहेत. कोकणकड्यापासून 800 फूट खाली ट्रेकर्स अडकले असून, ठाणे जिल्हा प्रशासनाच्या वतीने ट्रेकर्सना सुरक्षित स्थळी आणण्यासाठी बचावकार्य सुरु करण्यात आले आहे. काल संध्याकाळची (25 नोव्हेंबर) ही घटना आहे.

हरिश्चंद्र गडावर ट्रेकिंगसाठी एकूण 30 जण गेले होते. हरिश्चंद्र गडावरुन खाली उतरताना कोकणकड्यापासून 800 फूट खाली यातील 17 जण अडकले. उर्वरीत ट्रेकर्स संध्याकाळीच खाली उतरले.

काल ट्रेकर्स गडावरच अडकल्याने अंधारातून बचावकार्य करण्यास अडथळा आला. त्यामुळे रात्रभर ट्रेकर्सना तिथेच राहावं लागलं आहे. सध्या जिल्हा प्रशासनाच्या वतीने बचावकार्य सुरु करण्यात आले आहे.

एनडीआरएफची टीम घटनास्थळी पोहोचली असून, जिल्हा प्रशासनाकडून सर्वोतपरी मदत केली जात आहे. ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण विभागाचे पोलिस,  जुन्नर पोलिसही घटनास्थळी दाखल झाले आहेत. तसेच, मुरबाडचे तहसीलदार अमित सानप हे देखील बचावकार्याच्या कामावर लक्ष ठेवून असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

माळशेज घाट – बेलपाडा येथे हे ट्रेकर्स उतरतील, अशी माहीती पोलिस निरीक्षक कादरी यांनी दिली. सर्व ट्रेकर्स सुरक्षित असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.