मुंबई

पाऊस LIVE UPDATE | LTT स्थानकावरुन लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द, 5000 प्रवासी अडकले

मुसळधार पावसामुळे मुंबईत मध्य रेल्वेची लोकल वाहतूक कोलमडली आहे. मध्य रेल्वेवर खोपोली, कर्जत ते कल्याण आणि कसारा ते कल्याण लोकल सेवा सकाळच्या वेळेत ठप्प आहे.

Read More »

विद्यार्थी-पालकांना मोठा दिलासा, पावसामुळे अकरावी प्रवेशांसाठी मुदतवाढ

शहर आणि उपनगरासह ठाणे परिसरात शुक्रवारी रात्रीपासूनच जोरदार पाऊस सुरु आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. याच थेट परिणाम अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेवरही पडला आहे. त्यामुळे अखेर राज्य सरकारने अकरावीच्या तिसऱ्या गुणवत्ता यादीतील प्रवेश प्रक्रियेची मुदत एक दिवसाने वाढवली.

Read More »

मुख्यमंत्री फडणवीसांचं चॅलेंज स्वीकारलं, नाना पटोलेंची घोषणा

काँग्रेसचे उपाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं  (Devendra Fadnavis) कामाचा हिशोब मांडण्याचेआव्हान स्वीकारलं आहे. मुख्यमंत्री फडणवीसांनी महाजनादेश यात्रेच्या पहिल्या सभेत अमरावती येथे विरोधकांना त्यांनी काय काम केलं आणि सरकारने काय काम केलं हे सांगण्याचं आव्हान दिलं होतं.

Read More »

राष्ट्रवादीतील गळतीमुळे शरद पवार जखमी : जितेंद्र आव्हाड

राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांची भाजपमध्ये ‘मेगाभरती’ सुरु असल्याच्या पार्श्वभूमीवर पक्षाध्यक्ष शरद पवार जखमी झाल्याची प्रतिक्रिया आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे

Read More »

नवी मुंबईतील पांडवकडा धबधब्यात चार विद्यार्थिनी वाहून गेल्या

नवी मुंबईतील पांडवकडा धबधब्यात चार विद्यार्थिनी वाहून गेल्या. त्यापैकी एकीचा मृतदेह सापडला असून अन्य तिघींचा शोध सुरु आहे

Read More »

पाऊस LIVE : धरणं भरली, नद्यांनी पात्रं सोडली, मुंबईत जोरदार, राज्यभरात दमदार पाऊस!

मुंबईसह उपनगरात आणि राज्यभरात जोरदार पाऊस (Rain) कोसळत आहे. जोरदार पावसामुळे (Rain)  जनजीवन विस्कळीत झालं आहे.

Read More »

EVM विरोधातील पत्रकार परिषदेवरुन आशिष शेलार आणि संदीप देशपांडे यांच्यात घमासान

आगामी निवडणुका बॅलेट पेपरवरच घ्याव्या या एकमुखी मागणीसाठी सर्वपक्षीय मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. या पत्रकार परिषदेवरुन शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यात चांगलीच जुंपली आहे.

Read More »

मुंबईत कॉलेज विद्यार्थिनीची छेड, दूधवाल्याला बेड्या

मुंबई : मुंबईत महाविद्यालयीन विद्यार्थिनींची छेड काढणाऱ्या दूध विक्रेत्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. मालाडमधील एसएनडीटी कॉलेजजवळ छेड काढल्यानंतर एका तरुणीने तक्रार दाखल केली होती. एसएनडीटी

Read More »

ऑगस्ट महिन्यात 10 दिवस बँका बंद

यंदा ऑगस्ट महिन्यात रक्षाबंधन आणि श्रीकृष्ण जन्माष्टमी यासारखे अनेक महत्त्वाचे सण आले आहेत. त्यामुळे ऑगस्ट महिन्यात बँका तब्बल 10 दिवसांपेक्षा जास्त दिवस बंद राहणार आहे.

Read More »

तिहेरी तलाक विरोधात देशातील पहिला गुन्हा मुंब्य्रात, MBA महिलेची तक्रार

मुंब्रा : तिहेरी तलाक कायदा (Triple talaq bill) संमत झाल्यानंतर देशातील पहिला गुन्हा ठाणे जिल्ह्यातील मुंब्रामध्ये दाखल करण्यात आला आहे. पतीने व्हॉट्सअॅपवरुन तीन तलाक दिल्याची

Read More »

मुंबई-पुणे 31 मिनिटांत, फडणवीस सरकारची ‘हायपरलूप’ला मान्यता

मुंबई : मुंबईहून अवघ्या अर्ध्या तासात पुणे गाठण्याचं स्वप्न येत्या काही वर्षांत प्रत्यक्षात उतरणार आहे. विमानाने नव्हे, तर ‘हायपरलूप’ (Hyperloop) च्या माध्यमातून ही दोन शहरं

Read More »

EVM विरोधात 21 ऑगस्टला मोर्चा, राज ठाकरे, अजित पवार, बाळासाहेब थोरात, राजू शेट्टींची एकत्र घोषणा

आगामी निवडणुका बॅलेट पेपरवरच घ्याव्या या एकमुखी मागणीसाठी सर्वपक्षीय मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. येत्या 21 ऑगस्ट रोजी मुंबईत सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात येणार आहे

Read More »

फक्त ट्रेनिंगला पाठवणं बाकी होतं, MAT कडून 636 PSI ची नियुक्ती स्थगिती

राज्य पोलीस दलाने कोणतीही भरतीची जाहिरात नसताना आणि महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) मागणी नसतानाही ही भरती केली होती, असा निर्वाळा मॅटने (Maharashtra administrative tribunal) दिलाय. त्यामुळे सर्व प्रक्रियेला सामोरं गेलेल्या या उमेदवारांना मोठा धक्का बसलाय.

Read More »

VIDEO : Tik Tok व्हिडीओचा नाद नडला, बाईकवर स्टंट करताना तोंडावर पडला

मोटार सायकलवर स्टंटबाजी करणे एका तरुणाच्या जीवावर बेतलं आहे. Tik Tok व्हिडीओ काढण्याच्या नादात एका स्टंटबाज तरुणांची बाईक त्याच्या अंगावर पलटली.

Read More »

मुंबईकरांसाठी खूशखबर, मुंबईला पाणीपुरवठा करणारा विहार तलाव ओव्हरफ्लो

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तुळशी, तानसा, मोडक सागर या तलावानंतर आता आणखी एक तलाव ओव्हरफ्लो झाला आहे. बोरिवलीच्या नॅशनल पार्कच्या हद्द असलेला विहार तलाव (Vihar lake) भरला आहे.

Read More »

काँग्रेसच्या मुलाखतींकडे अनेक नेत्यांची पाठ, आता शिवसेनेत मेगा भरती?

पक्षातून आऊटगोईंग सुरु असताना काही वरिष्ठ नेत्यांनी विविध कारणं देत मुलाखतींकडे (Congress candidate Interview) पाठ फिरवली. यापैकी काही जण शिवसेनेत जाणार असल्याचंही बोललं जातंय. बुधवारी भाजपात अनेक नेत्यांनी प्रवेश केलाय. त्यामुळे आता शिवसेनेतही ‘मेगा भरती’ होणार का याकडे लक्ष लागलंय.

Read More »

कालिदास कोळंबकरांना शिवबंधनांची ऑफर होती, मुनगंटीवर यांचा गौप्यस्फोट

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी पक्षात आलेल्या नेत्यांचे स्वागत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवर यांनी अगदी अनोख्या पद्धतीने केले.

Read More »

आधी सुजयला पकडलं, राधाकृष्ण सापडले, वैभवला पकडलं मधुकर पिचड मिळाले, मुख्यमंत्र्यांनी रणनीती सांगितली!

भाजपमध्ये आज मेगाभरती पार पडली. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी या नेत्यांच्या भाजप प्रवेशामागची रणनीती सांगितली.| CM Devendra Fadnavis tells Strategies behind the congress NCP leaders joining BJP

Read More »

मधुकर पिचड, चित्रा वाघ यांच्यासह काँग्रेस-राष्ट्रवादीचे 4 आमदार भाजपमध्ये दाखल!

विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादीला (Congress-NCP) भगदाड पडलं आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीचे 4 आमदार आज भाजपमध्ये प्रवेश करत आहेत.

Read More »

सुनील तटकरे भेटीसाठी चंद्रकांत पाटलांच्या बंगल्यावर!

राष्ट्रवादीचे बडे नेते आणि विद्यमान खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) हे भेटीसाठी थेट भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या बंगल्यावर दिसले.

Read More »

गणेश नाईकांच्या प्रवेशाला विरोध, मुख्यमंत्र्यांच्या भेटीत मंदा म्हात्रेंची नाराजी दूर

बेलापूरच्या भाजप आमदार मंदा म्हात्रे यांची (BJP MLA Manda Mhatre) राष्ट्रवादीचे दिग्गज नेते गणेश नाईकांच्या भाजप प्रवेशावरुन असलेली नाराजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दूर केल्याचे सांगितले जात आहे.

Read More »

गणेश नाईकांनी पद्धतशीरपणे राष्ट्रवादी संपवली : जितेंद्र आव्हाड

गेल्या काही दिवसांपासून नाईक कुटुंब हे भाजपमध्ये जाणार याची चर्चा सुरु होती. अखेर ऐरोलीचे आमदार संदीप नाईक यांनी राजीनामा दिला आणि सुरु असलेल्या या चर्चांना पूर्णविराम लागला. यावर मात्र आव्हाडांनी नाराजी व्यक्त केली. नाईक कुटुंबावर त्यांनी जोरदार टीकाही केली आहे.  

Read More »

धनगर समाजाला राज्य सरकारचं गिफ्ट, अनुसूचित जमातींचे सर्व लाभ मिळणार

धनगर समाजाचा (Dhangar Reservation) अनुसूचित जमातींमध्ये (ST) समावेश करण्याची मागणी तीव्र होत असताना, राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. अनुसूचित जमातींमधील सर्व सवलती आता धनगर समाजाला  (Dhangar Reservation) लागू होणार आहेत.

Read More »

मुंबई-पुण्यात 120 वर्षांचा रेकॉर्डब्रेक पाऊस

मुंबईत जुलै महिन्यात सर्वाधिक पावसाची नोंद करण्यात आली आहे. यापूर्वी 1908 मध्ये सर्वाधिक पाऊस झाला होता. त्यानतंर 112 वर्षांनी जुलै महिन्यात रेकॉर्ड ब्रेक पावसाची नोंद करण्यात आली आहे.

Read More »

ठाण्यात घरावर दरड कोसळली, वडील आणि मुलाचा मृत्यू, एकजण जखमी

ठाण्यात डोंगराचा काही भाग कोसळ्याने एकाच घरातील दोघांचा मृत्यू झाला आहे. तर एकजण गंभीर जखमी आहे. ही घटना काल (29 जुलै) रात्री 12.20 च्या दरम्यान घडली.

Read More »

महाराष्ट्रातील महिला बालकल्याण विभागाचे काम उत्कृष्ट : स्मृती इराणी

केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री स्मृती इराणी यांनी महाराष्ट्राच्या महिला आणि बालकल्याण विभागाच्या काम उल्लेखनीय असल्याचे म्हणत कौतुक केले. तसेच कुपोषणमुक्ती, माता व बाल आरोग्य यातही राज्याचे उत्कृष्टपणे काम सुरू असल्याचे स्मृती इराणी म्हणाल्या.

Read More »

गणेश नाईकांच्या भाजप प्रवेशापूर्वीच आमदार मंदा म्हात्रे नाराज

बेलापूरच्या भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी (BJP MLA Manda mhatre) गणेश नाईकांच्या भाजपात येण्यावर टीका केली आहे. गणेश नाईक हे त्यांचं साम्राज्य वाचवण्यासाठी भाजपात येत असल्याचं मंदा म्हात्रे (BJP MLA Manda mhatre) यांनी म्हटलंय.

Read More »

महाराष्ट्रातील जंगलांमध्ये 122 वाघांची वाढ, व्याघ्र संवर्धन प्रकल्पाचे यश

महाराष्ट्रातील व्याघ्र संवर्धनाला चांगले यश मिळताना दिसत आहे. 2014 च्या तुलनेत 2019 मधील वाघांच्या संख्येत 122 वाघांची वाढ झाली आहे.

Read More »

1962 पासून आमदार, गणपतराव देशमुख यंदा निवडणूक लढवणार नाहीत

तब्बल अकरा वेळा सांगोला विधानसभा मतदारसंघातून विजयी झालेले सोलापूर जिल्ह्यातील आमदार गणपतराव देशमुख यांनी यंदाची विधानसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

Read More »

कालिदास कोळंबकरांचा काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा, भाजप प्रवेशाची तारीख ठरली

वडाळा विधानसभेचे आमदार कालिदास कोळंबकर यांनीही पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. तसेच उद्या मंगळवारी (30 जुलै) ते विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे आमदारकीचा राजीनामा देणार आहेत.

Read More »

EVM विरोधातील मोर्चेबांधणीसाठी राज ठाकरे ममता बॅनर्जींना भेटणार

मनसे अध्यक्ष राज ठाकरे येत्या बुधवारी (31 जुलै) तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींची भेट घेणार आहेत. याआधीही राज यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींची भेट घेतली होती.

Read More »

नवी मुंबईतील 57 नगरसेवकांचं भाजप प्रवेशावर एकमत, गणेश नाईकांच्या निर्णयाची प्रतीक्षा

या नगरसेवकांच्या भाजप प्रवेशामुळे नवी मुंबई महापालिकेतील सत्ताही राष्ट्रवादीला गमवावी लागणार आहे. आता गणेश नाईक (NCP Ganesh Naik) यांच्या निर्णयाकडे लक्ष लागलंय.

Read More »

राणेंचा ‘पावरगेम’! पुस्तक प्रकाशनला शरद पवार प्रमुख पाहुणे, मुख्यमंत्र्यांना मात्र वेळ नाही

येत्या 16 ऑगस्टला मुंबईत नारायण राणेंच्या पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम आयोजतित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला शरद पवार यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

Read More »

‘स्वाभिमान’ची ‘स्वाभिमानी’ला साथ? राजू शेट्टी नारायण राणेंच्या भेटीला

माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजु शेट्टी यांनी नुकतंच स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांची मुबंईत त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.

Read More »

वाढदिवसाच्या दिवशीच धारधार शस्त्राने वार करत मित्राकडून मित्राची हत्या

घाटकोपरमध्ये मित्रानेच मित्राची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. ही धक्कादायक घटना रविवारी (28 जुलै) मध्य रात्री साईबाबा गार्डन येथे घडली.

Read More »

कचरामुक्त मुंबई मोहिमेवरून श्रेयवादाचं राजकारण, महापौरांसह शिवसेनेच्या नेत्यांना आमंत्रणच नाही

स्वच्छ भारत अभियान अंतर्गत कचरामुक्त मुंबई मोहिमेवरुन मुंबईत श्रेय घेण्यावरुन राजकारण सुरु झाले आहे. या मोहिमेचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते होणार आहे. मात्र, मुंबई महानगरपालिकेचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना निमंत्रण पत्रिकेवरुन डावलण्यात आले आहे.

Read More »