लोकलमधून पडलेल्या तरुणाला सहप्रवाशांमुळे जीवदान

विरार स्टेशनजवळ एक प्रवाशी लोकलने प्रवास करत असताना त्याच्या बाबतीत दुर्देवाने जीवघेणा प्रसंग (Railway Accident) उद्भवला. मात्र त्याला स्टेशनजवळच्या पोलिसांकडून किंवा प्रशासनाकडून कोणतीही मदत (Emergency Help) मिळाली नाही.

लोकलमधून पडलेल्या तरुणाला सहप्रवाशांमुळे जीवदान

विरार : मुंबईची लाईफलाईन समजल्या जाणाऱ्या लोकल रेल्वेत कोणतीही अपघाताची घटना घडली, तर त्याला तात्काळ मूलभूत आरोग्य सुविधा मिळतात. तसेच जर दुखापत गंभीर असेल, तर त्या व्यक्तीला रुग्णालयापर्यंत पोहचवण्याची व्यवस्था करण्यात येते. विरार (Virar) स्टेशनजवळ एक प्रवासी लोकलने प्रवास करत असताना त्याच्या बाबतीत दुर्देवाने जीवघेणा प्रसंग (Railway Accident) उद्भवला. मात्र त्याला स्टेशनजवळच्या पोलिसांकडून किंवा प्रशासनाकडून कोणतीही मदत (Emergency Help) मिळाली नाही. पण सुदैवाने इतर प्रवाशांच्या सतर्कतेमुळे त्या तरुणाला जीवदान मिळाले. प्रशासनाच्या या यंत्रणेचा बोजावारा उडाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

विरार ते डहाणूदरम्यान लोकलने जात असताना स्वप्निल किनी (Swapnil kini) नावाच्या तरुणाला विरार स्टेशनजवळ लोकलमधून पडल्याने (Railway Accident) अपघात झाला. काल (9 ऑगस्ट) रात्री सव्वासातच्या दरम्यान ही घटना घडली. स्वप्निल हा पालघर जिल्ह्यातील मकुंसार सफ़ाळे येथील राहतो. ही घटना इतर प्रवाशांना समजल्यातरनं त्यांनी तात्काळ स्वप्निलला विरार स्थानकात आणले. मात्र त्यांना कोणतीही मदत मिळाली नाही. त्यामुळे काही प्रवाशांनी पोलिसांशी चर्चा करतानाचे काही व्हिडीओ मोबाईलमध्ये कैद केले.

त्यानंतर काही प्रवाशांनी त्याला नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र या सर्व प्रकारामुळे विरार स्टेशनवरील आपत्तीजनक परिस्थिती (Emergency Help) किती कमकुवत आहे हे निदर्शनास आलं आहे. तसेच जखमीला अशाप्रकारे प्रवाशांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्याने प्रशासनाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *