अटलांटिक महासागर पार करणारी जगातील पहिली महिला 'मुंबईकर'

मुंबई : मुंबईच्या 23 वर्षीय कॅप्टन आरोही पंडीत यांनी नवा विश्वविक्रम केला आहे. लाईट स्पोर्ट एअरक्राफ्टच्या सहाय्याने आरोही यांनी अटलांटिक महासागर पार केला आहे. अंटलांटिक महासागर पार करणारी आरोही ही पहिली महिला ठरली आहे. आरोहीने 13-14 मेच्या मध्यरात्री लाईट स्पोर्ट एअरक्राफ्टच्या सहाय्याने युकेमधील स्कॉटलँड या ठिकाणाहून एकटीने उड्डाण घेतले. या हवाई यात्रेदरम्यान ती आईसलँड आणि …

अटलांटिक महासागर पार करणारी जगातील पहिली महिला 'मुंबईकर'

मुंबई : मुंबईच्या 23 वर्षीय कॅप्टन आरोही पंडीत यांनी नवा विश्वविक्रम केला आहे. लाईट स्पोर्ट एअरक्राफ्टच्या सहाय्याने आरोही यांनी अटलांटिक महासागर पार केला आहे. अंटलांटिक महासागर पार करणारी आरोही ही पहिली महिला ठरली आहे.

आरोहीने 13-14 मेच्या मध्यरात्री लाईट स्पोर्ट एअरक्राफ्टच्या सहाय्याने युकेमधील स्कॉटलँड या ठिकाणाहून एकटीने उड्डाण घेतले. या हवाई यात्रेदरम्यान ती आईसलँड आणि ग्रीनलँड या दोन ठिकाणी थांबली. प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत तिने 3000 किमीची हवाईयात्रा पूर्ण केली. त्यानंतर तिने कॅनडातील Iqaluit विमानतळावर लँडिंग केले.

भारताच्या महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या सहकार्याने ‘महिला सशक्ती अभिनयानां’तर्गत, We Women Empower Expedition (‘वी! एक्सपीडिशन’) नावाची मोहीम आखण्यात आली आहे. या मोहिमेंतर्गत तीन टप्प्यांत संपूर्ण जगभर या एअरक्राफ्टने प्रवास करत ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’चा संदेश दिला जाणार आहे. या अंतर्गत आरोहीने हा विश्वविक्रम केला आहे.

आरोहीचे या नवीन उड्डाण भरारीचे जगभरात कौतुक होत आहे. तसेच अटालांटिक  महासागर पार करणारी पहिली महिला ठरली आहे.

”मी देशाची आभारी आहे. अटलांटिक महासागर एकटीने पार करण्याचा विलक्षण अनुभव होता. खाली निळा बर्फाप्रमाणे भासणारा समुद्र, वर निळे आकाश आणि त्यात छोटेसं विमान अस आरोहीने या यात्रेचं वर्णन केलं आहे.”

तसेच जगातील कोणतीही महिला अटलांटिक महासागर विमानाच्या सहाय्याने पार करु शकते, फक्त त्यासाठी जिद्द हवी अस म्हणत आरोहीने महिलांना प्रोत्साहित केलं आहे.

‘माही’ हे भारताचं पहिलं लाईट सपोर्ट एअरक्राफ्ट

आरोहीच्या लाईट स्पोर्ट एअरक्राफ्टचे नाव माही असे आहे. माही या विमानाचे वजन अवघे 500 किलो असून जे बुलेट बाईकपेक्षा कमी आहे. माही हे भारताचं पहिले नोंदणीकृत लाईट सपोर्ट एअरक्राफ्ट आहे. हे विमान स्लोव्हेनिया या देशात तयार करण्यात आलं आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *