अबू आझमी म्हणतात, पुणे, ठाणे, नवी मुंबईला ‘ही’ नावं द्या!

मुंबई: शहरांच्या नावाच्या नामांतराचा मुद्दा देशभर गाजत आहे. नावं बदलण्याची हवा उत्तर प्रदेशातून महाराष्ट्रात पोहोचली आहे. महाराष्ट्रात औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामकरणाच्या मागणीनंतर विद्येचं माहेरघर पुणे शहराचं नाव बदलण्याची मागणी झाली. विविध पक्ष, संघटनांनी शहरांची नावं बदलण्याची मागणी केली. त्यानंतर आता समाजवादी पक्षाचे नेते आणि आमदार अबू आझमी यांनीही नामांतर वादात उडी घेतली आहे. अबू आझमींनी […]

अबू आझमी म्हणतात, पुणे, ठाणे, नवी मुंबईला 'ही' नावं द्या!
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:57 PM

मुंबई: शहरांच्या नावाच्या नामांतराचा मुद्दा देशभर गाजत आहे. नावं बदलण्याची हवा उत्तर प्रदेशातून महाराष्ट्रात पोहोचली आहे. महाराष्ट्रात औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामकरणाच्या मागणीनंतर विद्येचं माहेरघर पुणे शहराचं नाव बदलण्याची मागणी झाली. विविध पक्ष, संघटनांनी शहरांची नावं बदलण्याची मागणी केली. त्यानंतर आता समाजवादी पक्षाचे नेते आणि आमदार अबू आझमी यांनीही नामांतर वादात उडी घेतली आहे. अबू आझमींनी नवी मुंबई, ठाणे आणि पुणे शहराचं नाव बदलण्याची मागणी केली. या तीनही शहरांना अबू आझमींनी नवी नावं सूचवली आहेत.

नवी मुंबई शहराचं नाव छत्रपती शिवाजी महाराज करा, ठाण्याचं नाव जिजामाता आणि पुण्याचे नाव छत्रपती संभाजी महाराज करा, असं अबू आझमी विधानसभेत म्हणाले. अबू आझमींनी थेट विधानसभेतच ही मागणी केली.

अबू आझमी म्हणाले, “नवी मुंबईला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव द्या, ठाण्याला जिजाबाईंचं तर पुण्याला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव द्या”

शहरांच्या नामांतराचं वारं

यापूर्वी औरंगाबादचं नाव संभाजीनगर, तर उस्मानाबादचं नाव धाराशीव करण्याची मागणी शिवसेनेने लावून धरली आहे. शिवसेना नेत्यांनी वेळोवेळी ही भूमिका मांडली आहे. “योगी आदित्यनाथ यांनी फैजाबादचे अयोध्या केले, अलाहाबादचे प्रयाग तिर्थ केले, मुख्यमंत्री देवेंद्रजी औरंगाबादचे संभाजी नगर आणि उस्मानाबादचे धाराशीव कधी करणार? असं ट्विट शिवसेना खासदार संजय राऊत यांनी 7 नोव्हेंबर रोजी केलं होतं.

त्यानंतर पुण्याचं नाव बदलून जिजापूर करा अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली. याबाबतचं पत्र राज्य सरकारला पाठवलं जाणार आहे. राज्य सरकारने औरंगाबाद जिल्ह्याचे नाव संभाजीनगर, उस्मानाबाद जिल्ह्याचे धाराशीव आणि पुणे शहराचे ‘जिजापूर’ करावं, अशी संभाजी ब्रिगेडची मागणी आहे. पुणे शहराला जिजाऊंचा वसा आणि वारसा असल्यामुळे संभाजी ब्रिगेडकडून मागणी करण्यात आली आहे.

उत्तर प्रदेशात शहारांची नावं बदलली 

 उत्तर प्रदेशात शहरांची नावं बदलण्याचा सपाटा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लावला आहे. नुकतंच फैजाबाद शहराचं नाव बदलून अयोध्या करण्यात आलं आहे. तर काही दिवसांपूर्वीच अलाहाबादचं नाव प्रयागराज करण्यात आलं होतं. एवढंच नाही, तर यानंतर अनेक शहरांची नावं बदलण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे.

संबंधित बातम्या 

पुण्याचं नाव जिजापूर करा, संभाजी ब्रिगेडची मागणी  

‘औरंगाबादचं संंभाजीनगर, उस्मानाबादचं धाराशीव करा’

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.