दिवंगत विलासरावांवर पियुष गोयलांची टीका, रितेश देशमुखकडून सडेतोड उत्तर

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचे माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांच्यावर टीका केल्यानंतर, मोदींच्याच मंत्रिमंडळातील मंत्र्याने आणखी एका हयात नसलेल्या काँग्रेस नेत्यावर टीका केली. रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांच्यावर 26/11 च्या हल्ल्याचा संदर्भ देत टीका केली. पियुष गोयल यांच्या टीकेला दिवंगत विलासराव देशमुखांचा मुलगा आणि सिनेअभिनेता रितेश […]

दिवंगत विलासरावांवर पियुष गोयलांची टीका, रितेश देशमुखकडून सडेतोड उत्तर
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 3:38 PM

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचे माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांच्यावर टीका केल्यानंतर, मोदींच्याच मंत्रिमंडळातील मंत्र्याने आणखी एका हयात नसलेल्या काँग्रेस नेत्यावर टीका केली. रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांच्यावर 26/11 च्या हल्ल्याचा संदर्भ देत टीका केली. पियुष गोयल यांच्या टीकेला दिवंगत विलासराव देशमुखांचा मुलगा आणि सिनेअभिनेता रितेश देशमुख याने सडेतोड उत्तर दिले आहे.

पियुष गोयल काय म्हणाले होते?

पंजाबमधील लुधियाना येथे पियुष गोयल यांनी काँग्रेसवर टीका करताना 26/11 च्या मुंबई हल्ल्याचा संदर्भ दिला आणि ते म्हणाले, “मी मुंबईकर आहे. तुम्हाला जर मुंबईवरील दहशतवादी हल्ला आठवत असेल, तर त्यावेळी राज्यात काँग्रेसचे सरकार होते. तीन दिवस दहशतवादी गोळीबार करत असताना, सरकारने काहीच केले नाही. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख हे घटनास्थळी एका सिनेनिर्मात्याला घेऊन गेले होते. या निर्मात्याच्या सिनेमात मुलाला (रितेश देशमुख) भूमिका मिळावी म्हणून विलासराव धडपडत होते.”

दिवंगत विलासराव देशमुख यांच्यावर रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी केलेल्या टीकेला विलासराव देशमुखांचा मुलगा आणि सिनेअभिनेता रितेश देशमुखने ट्विटरवरुन सडेतोड उत्तर दिले आहे.

रितेश देशमुखने काय म्हटले आहे?

आदरणीय मंत्री,

मी ताज/ऑबेरॉय हॉटेलमध्ये गेलो होतो, हे खरंय. मात्र, ‘गोळीबार आणि बॉम्बहल्ला’ सुरु होता, तेव्हा आम्ही तिथे गेलो होतो, हा तुमचा दावा पूर्णपणे खोटा आहे.

मी त्यावेळी माझ्या वडिलांसोबत (विलासराव देशमुख) गेलो होतो, हे खरंय. पण मला सिनेमात भूमिका मिळावी म्हणून ते प्रयत्न करत होते, हे खोटं आहे. मला सिनेमात भूमिका मिळावी म्हणून ते कधीच कुठल्या दिग्दर्शक किंवा निर्मात्याशी बोलले नाहीत आणि त्याचा मला अभिमान आहे.

मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारण्याचा तुम्हाला पूर्ण अधिकार आहे. मात्र, जी व्यक्ती तुमच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी जिवंत नाही, तिच्यावर आरोप करणे चुकीचे आहे.

सर, तुम्ही थोडा उशीर केलात. 7 वर्षांपूर्वी त्यांनी तुम्हाला उत्तर दिले असते.

तुमच्या प्रचाराला माझ्या शुभेच्छा!

रितेश विलासराव देशमुख

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.