'अदानी'कडून मुंबईत गुजरातीमध्ये वीज बिलं

मुंबई : ‘अदानी इलेक्ट्रिसिटी’कडून मुंबईजवळील मीरा-भाईंदर या भागात गुजराती भाषेत वीज बिलं दिल्याचा प्रकार समोर आला आहे. महाराष्ट्रात मराठी सोडून, गुजराती भाषेचा लळा अदानी इलेक्ट्रिसिटीला लागल्याने, स्थानिक नागरिकांकडून संताप व्यक्त केला जातो आहे. दोनच महिन्यांपूर्वी रिलायन्सकडून अदानीने मुंबई आणि परिसरातील इलेक्ट्रिसिटी पुरवठा स्वत:कडे घेतला. त्यानंतर विजेचे दर वाढवल्याचा आरोपही अदानी इलेक्ट्रिसिटीवर करण्यात आला. वाढलेल्या दराबाबत …

, ‘अदानी’कडून मुंबईत गुजरातीमध्ये वीज बिलं

मुंबई : ‘अदानी इलेक्ट्रिसिटी’कडून मुंबईजवळील मीरा-भाईंदर या भागात गुजराती भाषेत वीज बिलं दिल्याचा प्रकार समोर आला आहे. महाराष्ट्रात मराठी सोडून, गुजराती भाषेचा लळा अदानी इलेक्ट्रिसिटीला लागल्याने, स्थानिक नागरिकांकडून संताप व्यक्त केला जातो आहे.

दोनच महिन्यांपूर्वी रिलायन्सकडून अदानीने मुंबई आणि परिसरातील इलेक्ट्रिसिटी पुरवठा स्वत:कडे घेतला. त्यानंतर विजेचे दर वाढवल्याचा आरोपही अदानी इलेक्ट्रिसिटीवर करण्यात आला. वाढलेल्या दराबाबत आधीच अदानी इलेक्ट्रिसिटीवर नागरिकांचा रोष असतानाच, आता मुंबईजवळील मीरा-भाईंदरमध्ये गुजराती भाषेत वीज बिलं वाटल्याचे समोर आले आहे.

, ‘अदानी’कडून मुंबईत गुजरातीमध्ये वीज बिलं

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी भाईंदर फाटकाजवळ असलेल्या अदानी इलेक्ट्रॉनिक कार्यालयसमोर आंदोलन केलं. आंदोलन करत असताना शिवसैनिकांनी गुजराती भाषेत असलेल्या वीज बिलांच्या प्रती जाळल्या आणि विरोध दर्शवला.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *