आकाश अंबानीची बॅचलर पार्टी स्वित्झर्लंडमध्ये, आकाश-श्लोकाची लग्नपत्रिका पाहिली का?

मुंबई : देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाश अंबानी (Akash Ambani ) हा लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. व्यापारी रसेल मेहता यांची मुलगी श्लोका मेहता हिच्याशी आकाशचा विवाह होणार आहे. येत्या 9 मार्चला मुंबईत हा विवाहसोहळा पार पडणार आहे. गेल्या वर्षी 28 जूनला त्यांचा साखरपुडा झाला होता. आकाश आणि श्लोका यांच्या लग्नाची …

आकाश अंबानीची बॅचलर पार्टी स्वित्झर्लंडमध्ये, आकाश-श्लोकाची लग्नपत्रिका पाहिली का?

मुंबई : देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाश अंबानी (Akash Ambani ) हा लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. व्यापारी रसेल मेहता यांची मुलगी श्लोका मेहता हिच्याशी आकाशचा विवाह होणार आहे. येत्या 9 मार्चला मुंबईत हा विवाहसोहळा पार पडणार आहे. गेल्या वर्षी 28 जूनला त्यांचा साखरपुडा झाला होता.

आकाश आणि श्लोका यांच्या लग्नाची पत्रिका समोर आली आहे. ईशा अंबानीच्या लग्नाच्या पत्रिकेप्रमाणेच आकाशचीही लग्न पत्रिका खास आहे. ही पत्रिका एखाद्या बॉक्स सारखी आहे, ज्याच्या आत वेगवेगळ्या लेयर्स आहेत. या पत्रिकेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. लग्नात आमंत्रित पाहुण्यांपैकी कुणी हा व्हिडीओ शेअर केला असावा असे सांगितले जात आहे.

ही पत्रिका धार्मिक असून ही राधा-कृष्ण या थीमवर तयार करण्यात आली आहे. ही पत्रिका उघडताच यातून  “अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम” हे भजन ऐकू येतं. दुसऱ्या लेयरमध्ये भगवान कृष्ण आणि राधा यांची आकर्षक फोटो फ्रेम समोर येते. तिसऱ्या लेयरमध्ये लग्नविधींची माहिती आहे. तसेच यात अनेक ठिकाणी लहान-लहान मेसेजही लिहिण्यात आले आहेत. ही पत्रिका खूप सुंदर आणि आकर्षक आहे. मुकेश अंबानी आणि नीता अंबानींनी सिद्धिविनायक मंदिरात आकाशच्या लग्नाची पहिली पत्रिका गणपतीचरणी अर्पण केली.

हा लग्न समारंभ जिओ वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये तीन दिवस चालणार आहे. आकाश अंबानीच्या लग्नाची वरात 9 मार्चला दुपारी 3.30 वाजता मुंबईतील जिओ सेंटरमध्ये येईल, संध्याकाळी सातपासून लग्नाच्या विधींना सुरुवात होईल. लग्नसोहळा पार पडल्यानंतर 10 मार्चला वेडिंग सेलिब्रेशन होणार आहे. हा कार्यक्रम जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये आयोजित करण्यात आला आहे. तर 11 मार्चला वेडिंग रिसेप्शन आहे. यावेळी दोन्ही परिवार आणि जवळची मित्रमंडळी उपस्थित असतील. रिसेप्शन सोहळाही जिओ सेंटर येथे होणार आहे.

लग्न सोहळ्याआधी आकाश आपल्या मित्रांना स्वित्झर्लंडमध्ये बॅचलर पार्टी देणार आहे. ज्यामध्ये त्याच्या जवळच्या मित्रांचा समावेश असेल. या पार्टीसाठी आकाश अंबानी लवकरच स्वित्झर्लंडला जाणार आहे. ही पार्टी 23 ते 25 पर्यंत चालणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या बॅचलर पार्टीमध्ये बॉलिवूड सेलिब्रिटींचाही समावेश असेल. रणबीर कपूर आणि करण जोहर सुद्धा स्वित्झर्लंडला जाणार आहेत. ही पार्टी स्वित्झर्लंडमधील St. Moritz येथे आयोजित करण्यात आली आहे.

VIDEO :

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *