मनसेच्या दणक्यानंतर ॲमेझॉनपाठोपाठ फ्लिपकार्टलाही उपरती, मराठी भाषेचाही पर्याय उपलब्ध

मनसेला पत्र पाठवून मराठी भाषा लवकरच समाविष्ट केली जाईल, अशी फ्लिपकार्टनं शाश्वती दिली आहे.

मनसेच्या दणक्यानंतर ॲमेझॉनपाठोपाठ फ्लिपकार्टलाही उपरती, मराठी भाषेचाही पर्याय उपलब्ध

मुंबईः मनसेच्या अखिल चित्रे यांनी फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉनला मनसे स्टाइल इशारा दिल्यानंतर फ्लिपकार्टनंही ॲपमध्ये मराठी भाषेचा समावेश करण्यास मान्यता दिली आहे. मनसेला पत्र पाठवून मराठी भाषा लवकरच समाविष्ट केली जाईल, अशी फ्लिपकार्टनं शाश्वती दिली आहे. (Marathi language option is also available in Flipkart app)

विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपूर्वी ऑनलाईन शॉपिंगसाठी महत्त्वाची ई-कॉमर्स कंपनी असलेल्या अ‍ॅमेझॉनने अ‍ॅपमध्ये मराठी भाषेचा समावेश केला होता. मनसेने अ‍ॅमेझॉनला खळ्ळ खट्याकची धमकी दिल्यानंतर अ‍ॅमेझॉन इंडियानं नमते घेतले होते. यूएसएचे प्रतिनिधी आणि मनसे चिटणीस अखिल चित्रे यांच्यात बीकेसी कार्यालयात एक व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून बैठक झाली. त्यानंतर अ‍ॅमेझॉन मराठी भाषेचा समावेश करण्यासाठी तयार झाली.

अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्टच्या ऍपमध्ये मराठी भाषेचा समावेश करण्यासाठी मनसेनं आक्रमक पवित्रा घेतला होता. स्वत: अ‍ॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोज यांनी मनसेच्या मेलची दखल घेतली होती. अ‍ॅमेझॉन अ‍ॅपमध्ये मराठी भाषेचा समावेश करण्यासाठी 20 दिवस लागणार असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच अ‍ॅपमधील इतर भाषा महाराष्ट्रात ब्लॉक करा, अशी मागणीही मनसेनं केली होती.

‘अ‍ॅमेझॉन’च्या डिजिटल सेवेत मराठीला प्राधान्य देण्याच्या मनसेच्या आग्रही मागणीची अ‍ॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझॉस यांच्या प्रतिनिधींनी दखल घेतली. ‘अ‍ॅमेझॉन’चं शिष्टमंडळ मुंबईत आलं होतं. राजसाहेब म्हणतात तसं, तुम्ही तुमच्या भाषेवर ठाम असाल तर जग तुमची दखल घेतं,” असं अखिल चित्रेंनी लिहिलं होतं. अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट या ऑनलाईन शॉपिंग अ‍ॅपमध्ये मराठी भाषेचा समावेश करावा, या मागणीसाठी मनसेने 15 ऑक्टोबरला संबंधित कंपन्यांच्या मुंबईतील ऑफिसला धडक दिली होती. अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट या ऑनलाईन शॉपिंग कंपन्यांच्या बीकेसीमधील ऑफिसमध्ये जाऊन मनसेने आंदोलनाचा इशारा दिला होता.

मनसेचा खळ्ळ खट्यॅकचा इशारा

अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्टच्या अ‍ॅपमध्ये मराठी भाषेचा समावेश करा, अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन करु, असा इशारा मनसेने दिला. यावेळी खिल चित्रे यांनी स्टाफला खडे बोलही सुनावले. जर सात दिवसांत मराठी भाषेचा पर्याय ठेवला नाही, तर स्टाफला लाथ मारुन बाहेर काढण्याची धमकीही मनसेने दिली होती.

संबंधित बातम्या :

मनसेच्या इशाऱ्यानंतर जेफ बेझॉस नमले, ‘अ‍ॅमेझॉन’मध्ये मराठीच्या समावेशासाठी हालचाली

अ‍ॅमेझॉन-फ्लिपकार्टच्या ऑफिसवर मनसेची कूच; ‘मराठी’साठी खळ्ळखट्याकचा दिला इशारा

(Marathi language option is also available in Flipkart app)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *