आरेच्या नावानं बोंब मारता मग आरेतला बलात्कार दिसला नाही का? : आशिष शेलार

भाजप नेते आशिष शेलार यांच्यासह चित्रा वाघ आणि प्रसाद लाड यांनी महिला अत्याचाराच्या मुद्द्यावर ठाकरे सरकारवर सडकून टीका केली आहे (Ashish Shelar criticize Thackeray Government over Violence against Women).

आरेच्या नावानं बोंब मारता मग आरेतला बलात्कार दिसला नाही का? : आशिष शेलार
Follow us
| Updated on: Oct 12, 2020 | 6:51 PM

मुंबई : भाजप नेते आशिष शेलार यांच्यासह चित्रा वाघ आणि प्रसाद लाड यांनी महिला अत्याचाराच्या मुद्द्यावर ठाकरे सरकारवर सडकून टीका केली आहे (Ashish Shelar criticize Thackeray Government over Violence against Women). या सरकारला कसलीही लाज वाटत नाही. एवढं सगळं होतंय, पण यांना फक्त राजकारण करता येतंय, असा आरोप आशिष शेलार यांनी केला आहे. प्रसाद लाड यांनी मुंबईतील वीजेच्या प्रश्नावरुन सरकारवर निशाणा साधला. भाजपच्या महिला मोर्चाचा धसका घेतल्यानेच मुंबईची लाईट घालवल्याचा आरोप प्रसाद लाड यांनी केला.

आशिष शेलार म्हणाले, “ठाकरे सरकार हे फक्त झोपलेलं सरकार आहे. त्यांना आता जागं करण्यासाठी हा मोर्चा काढला आहे. याची दखल घेतली नाही, तर देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात हाच आक्रोश रस्त्यावर उतरेल. दोन महिन्याच्या आत महिला अत्याचार प्रकरणाचा तपास पूर्ण केलाच पाहिजे अशा केंद्र सरकारच्या गाईडलाईन्स आहेत. मात्र, महाराष्ट्रात तसं होताना दिसत नाही.”

“या सरकारला विद्यार्थी, शेतकरी, महिलांबद्दल काहीच पडलेलं नाही. मुख्यमंत्र्यांना बाकीचं काहीच देणं घेणं नाही. आरेच्या नावानं बोंब मारता मग आरेतला बलात्कार दिसला नाही का? रिहा चक्रवर्तीची चिंता आहे, तिची काळजी कराच, पण बाकीच्यांच काय?” असेही सवाल आशिष शेलार यांनी विचारले.

प्रसाद लाड म्हणाले, “कायदा आणि सुव्यवस्थेचे रोज धिंडवडे निघत आहेत. महिलांवरील अत्याचार शिगेला पोहोचलेले आहेत. असं असताना निष्क्रीय बसून राहणाऱ्या सरकारच्या निषेधात शिवाजी पार्कवर जनतेचा प्रचंड आक्रोश दिसून आला. सरकार विरोधात भाजपने काढलेल्या मोर्चाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.” यावेळी लाड यांनी सरकारने भाजप महिला मोर्चाचा धसका घेतला म्हणूनच मुंबईची लाईट घालवल्याचाही आरोप केला.

चित्रा वाघ यांनी देखील हे सरकार लाज आणणारं बेशरम सरकार असल्याची घणाघाती टीका केली.

संबंधित बातम्या :

‘राज्यात दिशा कायदा तात्काळ लागू करा’, भाजपचं राज्यभरात महिला अत्याचारविरोधात आक्रोश मोर्चे

संबंधित व्हिडीओ :

Ashish Shelar criticize Thackeray Government over Violence against Women

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.