रामदास आठवलेंना अज्ञात व्यक्तीकडून मारहाण

अंबरनाथ (ठाणे) : केंद्रीय समजाकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांना अज्ञात व्यक्तीने मारहाण केली आहे. ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथे ही घटना घडली. आठवलेंना मारहाण करणाऱ्या व्यक्तीला आठवलेच्या समर्थकांनी पकडलं आणि चोप दिला. रामदास आठवले सुरक्षित आहेत. प्रवीण गोसावी असे रामदास आठवले यांना मारहाण करणाऱ्याचे नाव आहे. त्याला आठवलेंच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली आहे. त्याच्यावर सध्या हॉस्पिटलमध्ये उपचार …

, रामदास आठवलेंना अज्ञात व्यक्तीकडून मारहाण

अंबरनाथ (ठाणे) : केंद्रीय समजाकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांना अज्ञात व्यक्तीने मारहाण केली आहे. ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथे ही घटना घडली. आठवलेंना मारहाण करणाऱ्या व्यक्तीला आठवलेच्या समर्थकांनी पकडलं आणि चोप दिला. रामदास आठवले सुरक्षित आहेत.

प्रवीण गोसावी असे रामदास आठवले यांना मारहाण करणाऱ्याचे नाव आहे. त्याला आठवलेंच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली आहे. त्याच्यावर सध्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.

सहा डिसेंबरला रामदास आठवले यांना झेड प्लस सुरक्षा होती, आज सुरक्षेचं नेमकं काय झालं माहित नाही. मात्र, आठवले सुरक्षित आहेत, असे रिपाइंच्या आठवले गटाचे नेते अविनाश महातेकर यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना म्हणाले.

पाहा व्हिडीओ :

LIVE: रामदास आठवलेंना अज्ञात व्यक्तीकडून मारहाण

LIVE: रामदास आठवलेंना अज्ञात व्यक्तीकडून मारहाण, मुंबईजवळील अंबरनाथमधील घटना

Posted by TV9 Marathi on Saturday, December 8, 2018

रामदास आठवले कोण आहेत?

रामदास आठवले हे केंद्रीय समजाकल्याण राज्यमंत्री आहे. आठवले हे रिपब्लिकन ऑफ इंडियाच्या आठवले गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. दलित पँथरमधून रामदास आठवले पुढे राजकारणात सक्रीय झाले. राज्य, देश पातळीवर अत्यंत महत्त्वाची पदं त्यांनी आतापर्यंत भूषवली आहेत. सक्रीय नेते म्हणून रामदास आठवले यांच्याकडे पाहिले जाते. राजकीय वैराच्या पलिकडे जात दिलखुलास माणूस म्हणूनही त्यांची ओळख आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *