शिवसेनेच्या विभागप्रमुखावर परप्रांतीयाचा प्राणघातक हल्ला

सार्वजनिक ठिकाणी लघुशंका केल्याचा व्हिडीओ काढल्याच्या रागातून एका परप्रांतीयाने शिवसेनेच्या विभागप्रमुखावर जीवघेणा हल्ला केला आहे.

शिवसेनेच्या विभागप्रमुखावर परप्रांतीयाचा प्राणघातक हल्ला

नालासोपारा : शिवसेनेच्या विभागप्रमुखावर परप्रांतीयाने जीवघेणा हल्ला केल्याचा (Attack On Shivsena Leader) धक्कादायक प्रकार नालासोपाऱ्यात घडला आहे. सार्वजनिक ठिकाणी लघुशंका केल्याचा व्हिडीओ काढल्याच्या रागातून एका परप्रांतीयाने शिवसेनेच्या विभागप्रमुखावर जीवघेणा हल्ला केला आहे (Attack On Shivsena Leader).

आज दुपारी साडे बाराच्या दरम्यान ही घटना घडली आहे. नालासोपारा पूर्वेकडील संयुक्त नगर येथील विभागप्रमुख जितेंद्र हजारे हे आपल्या कार्यालयातून घराकडे जात असताना, ऑफिसच्या बाजूचा लोखंडी स्टील विकणारा यादव नावाचा व्यक्ती सार्वजनिक स्थळी लघुशंका करत असल्याचं हजारे यांच्या निदर्शनास आलं. त्यावेळी त्यांनी आपल्या मोबाईलमधून त्याचा व्हिडीओ काढला.

व्हिडीओ काढत असल्याचं लक्षात येताच, यादव आणि आणखीन दोघांनी, लोखंडी रॉड ने हजारेंवर जीवघेणा प्रहार केला. यात हजारे यांना डोक्याला आणि हाताला गंभीर जखम झाली आहे. हाताचे बोटही फ्रॅक्चर झाली आहे. सध्या तुलिंज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचं काम सुरु आहे.

Attack On Shivsena Leader

संबंधित बातम्या :

पार्थ पवारच्या बोलण्याला आम्ही कवडीचीही किंमत देत नाही : शरद पवार

माजी महापौरांची मागणी मान्य करुन घेतली, आदित्य ठाकरेंचा मुंबईकरांना दिलासा

नवी मुंबईत ‘सिडको’ विकास अधिकाऱ्याला काळे फासले, सहा पदाधिकाऱ्यांवर अखेर गुन्हा

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *