कोरोना झालेल्या १६ मंत्र्यांपैकी एकानेही सरकारी रुग्णालयात भरती होण्याचं धाडस का दाखवलं नाही? भाजपचा सवाल

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर ते सेंट जॉर्ज सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले आहेत. मात्र, कोरोनाची लागण झालेल्या १६ मंत्र्यांपैकी एकही मंत्र उपचारासाठी सरकारी रुग्णालयात का दाखल झाला नाही? असा सवाल भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी विचारला आहे.

कोरोना झालेल्या १६ मंत्र्यांपैकी एकानेही सरकारी रुग्णालयात भरती होण्याचं धाडस का दाखवलं नाही? भाजपचा सवाल

मुंबई: विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कोरोनाची लागण झाल्यानंतर सरकारी रुग्णालयात दाखल होण्याचा निर्णय घेतला आणि ते सेंट जॉर्ज रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी राज्य सरकारला प्रश्न विचारलाय. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस कोरोना झाल्यानंतर सरकारी रुग्णालयात भरती झाले. यावरुन सत्ताधारी पक्ष आपली आरोग्य यंत्रणा अप्रतिम असल्याचा निर्वाळा देत पाठ थोपटून घेत आहे. मग कोरोनाची लागण झालेल्या 16 पैकी एकाही मंत्र्याने शासकीय रुग्णालयात भरती होण्याची हिंमत का दाखवली नाही? असा सवाल भातखळकरांनी केलाय. (BJP MLA Atul Bhatkhalkar questions to state government on government hospital)

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी गेले होते. त्यानंतर त्यांनी राज्यात अतिवृष्टीमुळं झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणीही केली. मात्र, शनिवारी त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं. स्वत: देवेंद्र फडणवीस यांनी तशी माहिती दिली. ‘माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळं मी स्वत:ला कॉरंटाईन करुन घेतलं आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी काळजी घ्या’, असं आवाहन फडणवीस यांनी केलं होतं. सध्या फडणवीस यांच्यावर मुंबईतील सेंट जॉर्ज या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ‘मला कोरोना झाल्यास सरकारी रुग्णालयात दाखल करा’, असं आपले सहकारी गिरीश महाजन यांना सांगितलं होतं. त्याप्रमाणे देवेंद्र फडणवीस कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर सरकारी रुग्णालय सेंट जॉर्जमध्ये उपचार घेत आहेत. सरकारी यंत्रणेवरील विश्वास दाखवण्यासाठी फडणवीस सेंट जॉर्जमध्ये दाखल झाल्याचं गिरीश महाजन म्हणाले.

मुख्यमंत्र्यांकडून रुग्णालयाला सूचना- राऊत

देवेंद्र फडणवीस यांच्या तब्येतीची योग्य काळजी घेण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रुग्णालयाला दिल्या असल्याची माहिती शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यातही राऊत यांनी फडणवीस लवकर बरे व्हावेत, कारण आम्हाला लढण्यासाठी समोर तगडा पैलवान हवा आहे, असं वक्तव्य केलं होतं.

संबंधित बातम्या:

‘देवेंद्र फडणवीसांनी लवकर बरे व्हावे; आम्हाला लढण्यासाठी समोर तगडा पैलवान पाहिजे’

देवेंद्र फडणवीस सरकारी रुग्णालयांवर विश्वास दाखवण्यासाठी सेंट जॉर्जमध्ये दाखल: गिरीश महाजन

 

BJP MLA Atul Bhatkhalkar questions to state government on government hospital

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *