बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर भीमसागर

मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 128 व्या जयंतीनिमित्त दादर चैत्यभूमी येथे मोठ्या प्रमाणात आंबेडकरी अनुयायी दर्शनासाठी आले आहेत. बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी दरवर्षी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो अनुयायी येत असतात. तसेच महापालिकेतर्फे येथे जय्यत तयारी करण्यात आली आहे. यासोबतच चैत्यभूमीवर थोड्याचवेळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही दर्शनासाठी येणार आहेत. आज महाराष्ट्रासह देशभरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती […]

बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर भीमसागर
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:02 PM

मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 128 व्या जयंतीनिमित्त दादर चैत्यभूमी येथे मोठ्या प्रमाणात आंबेडकरी अनुयायी दर्शनासाठी आले आहेत. बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी दरवर्षी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो अनुयायी येत असतात. तसेच महापालिकेतर्फे येथे जय्यत तयारी करण्यात आली आहे. यासोबतच चैत्यभूमीवर थोड्याचवेळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही दर्शनासाठी येणार आहेत.

आज महाराष्ट्रासह देशभरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती जल्लोषात साजरी केली जाते. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आज ट्विटरवरुन डॉ. बाबासाहेबांना अभिवादन केलं आहे. यावर मोदींनी बाबासाहेबांवर एक व्हिडीओही पोस्ट केला आहे. यामध्ये बाबासाहेबांच्या कार्याबद्दल माहिती देण्यात आली आहे.

चैत्यभूमी आणि दीक्षाभूमी येथे काल रात्रीपासून मोठ्या संख्येने अनुयायी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येत आहेत. चैत्यभूमीवर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे. तसेच अनेक राजकीय मंडळीही आज दर्शनासाठी येथे येणार आहेत.

14 एप्रिल हा दिवस संपूर्ण देशभरात डॉ. बाबासाहेब आंबडेकर जयंती म्हणून साजरा केला जातो. याच दिवशी म्हणजे 14 एप्रिल 1891 रोजी बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म मध्यप्रदेशमधील महू या गावी झाला होता. देशात मोठ्या संख्येने बाबासाहेबांना मानणारा वर्ग आहे.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.