बेस्ट कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण, मुंबईत 40 बेस्ट कर्मचारी कोरोनाबाधित

अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या बेस्ट कर्मचाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण झाल्याचे समोर येत (BEST Employee Corona Patient) आहे.

बेस्ट कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण, मुंबईत 40 बेस्ट कर्मचारी कोरोनाबाधित

मुंबई : राज्यातील कोरोनाबाधितांच्या आकड्यात दिवसेंदिवस वाढ होत (BEST Employee Corona Patient) चालली आहे. डॉक्टर, नर्स, पोलीस कर्मचारी यांच्यासह आता बेस्ट कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. मुंबई शहरात आतापर्यंत 40 बेस्ट कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या बेस्ट कर्मचाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण झाल्याचे समोर येत आहे.

मुंबई शहर हे कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहे. त्यामुळे शहरातील कोरोनाबाधितांच्या (BEST Employee Corona Patient) संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. मुंबईतील 40 बेस्ट कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. यातील तीन कर्मचाऱ्यांचा दुदैवाने मृत्यू झाला आहे. तर सुदैवाने यातील 9 जणांना डिस्चार्ज देण्यात आले आहेत.

दरम्यान यातील 50 टक्के कोरोनाबाधित कर्मचाऱ्यांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळलेली नाहीत.

बेस्ट कर्मचाऱ्यांना होणारा कोरोना संसर्ग रोखण्यासाठी `बेस्ट कोविड रॅपिड अॅक्शन टीम´ तयार करण्यात आली आहे. या रॅपिड अॅक्शन टीममध्ये बेस्टच्या सर्व विभागांच्या प्रमुखांचा समावेश असणार आहे.

या टीमद्वारे बेस्ट कर्मचारी आणि त्याचे कुटुंब यांची संपूर्ण माहिती, वैद्यकीय अहवाल या सर्व गोष्टी वेळोवेळी तपासले जाणार आहेत.

राज्यात 385 पोलीस कोरोनाबाधित 

दरम्यान आतापर्यंत कोरोनाचा सामना करताना काही पोलीस अधिकारी आणि  पोलीस कर्मचारी हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. राज्यात आतापर्यंत 385 पोलिसांना कोरोनाची बाधा झाली आहे. यात 35 पोलीस अधिकारी आणि 350 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर दुर्देवाने 3 पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू  झाला आहे.

मुंबईत कोरोनाबाधितांचा आकडा वाढताच

मुंबईत काल दिवसभरात तब्बल 510 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आता मुंबईत कोरोना बाधितांची संख्या 9 हजार 123 वर येऊन पोहोचली आहे. मुंबईत काल दिवसभरात 18 जणांचा मुंबईत मृत्यू, मुंबईतील मृत्यूचा आकडा 361 वर, तर मुंबईत आतापर्यंत 1,908 रुग्ण बरे झाले (BEST Employee Corona Patient) आहेत.

संबंधित बातम्या : 

Corona Updates: महाराष्ट्रात 771 नव्या कोरोना रुग्णांची नोंद, एकूण आकडा 14 हजार 541 वर

Mumbai Corona Update : बीडीडी चाळ 8 दिवस पूर्णपणे लॉकडाऊन, बीएमसी आणि पोलिसांचा निर्णय

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *