दिवाळी संपली, तरी बेस्ट कर्मचाऱ्यांना बोनस नाही!

मुंबई : मोठ्या तोऱ्यात बेस्ट प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांना दिवाळीचा बोनस देण्याची घोषणा झाली. अगदी रक्कमही माध्यमांपर्यंत पोहोचवण्यात आली. मात्र, प्रत्यक्षात बेस्टच्या कर्मचाऱ्यांना बोनस काही मिळाला नाही. बोनसची घोषणा कागदावरच राहिल्याचे सध्या चित्र असून, कर्मचाऱ्यांमध्ये याबाबत प्रचंड नाराजी आहे. बेस्ट प्रशासन आर्थिकदृष्टी तोट्यात आहे. बेस्ट प्रशासनाकडे पैसे नाहीत. हे एव्हाना सर्वश्रुत आहे. मात्र, आर्थिकदृष्ट्या तोट्यात आहोत, हे …

दिवाळी संपली, तरी बेस्ट कर्मचाऱ्यांना बोनस नाही!

मुंबई : मोठ्या तोऱ्यात बेस्ट प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांना दिवाळीचा बोनस देण्याची घोषणा झाली. अगदी रक्कमही माध्यमांपर्यंत पोहोचवण्यात आली. मात्र, प्रत्यक्षात बेस्टच्या कर्मचाऱ्यांना बोनस काही मिळाला नाही. बोनसची घोषणा कागदावरच राहिल्याचे सध्या चित्र असून, कर्मचाऱ्यांमध्ये याबाबत प्रचंड नाराजी आहे.

बेस्ट प्रशासन आर्थिकदृष्टी तोट्यात आहे. बेस्ट प्रशासनाकडे पैसे नाहीत. हे एव्हाना सर्वश्रुत आहे. मात्र, आर्थिकदृष्ट्या तोट्यात आहोत, हे माहित असातनाही बेस्ट प्रशासनाने कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर का केला, आणि केला तर मग दिला का नाही, असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत.

5,500 रुपयांचा बोनस बेस्ट प्रशासनाने जाहीर केला होता. मात्र, प्रशासकीय तरतूद नसल्याने कर्मचाऱ्यांना बोनस देऊ शकत नाही, अशी कबुली बेस्ट प्रशासनाने दिली आहे.

बेस्टच्या 40 हजार कर्मचाऱ्यांच्या बोनसपोटी 22 कोटी रुपये खर्च करावे लागणार आहेत. बेस्टची सध्याची आर्थिक स्थिती पाहता, इतकी मोठी रक्कम प्रशासन खर्च करेल का, यावर आधीच शंका घेतली जात होती. मात्र, घोषणा केल्यावर पुन्हा बोनस न देणाऱ्या बेस्टबद्दल आता संताप व्यक्त केला जातो आहे.

एकीकडे मुंबई महापालिकेतील कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी बोनस मिळाल्यानं त्यांची दिवाळी आनंदात साजरी झाली आहे. मात्र, महापालिकेच्याच एका विभागाचे भाग असताना, बेस्टच्या कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या शेवटच्या दिवसापर्यंत वाट पाहूनही बोनस काही हाती आला नाही.

आर्थिक स्थिती नसताना मोठ्या तोऱ्यात बोनस जाहीर करणाऱ्या बेस्टबद्दल कर्मचाऱ्यांच्या भावना तीव्र आहेत.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *