जाहिरात एजन्सीची 'क्वीन' भूमिका सिंहची आत्महत्या

मुंबई : जाहिरात एजन्सीत काम करणाऱ्या भूमिका सिंह हिने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. मुंबईतील वाकोला परिसरातील या घटनेने जाहिरात क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. भूमिका सिंहचे वय 30 वर्षे होते. तणावातून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज असला, तरी नेमकं कारण अद्याप कळू शकलेलं नाही. भूमिका सिंह हिच्या मृतदहेजवळ पोलिसांनी एक डायर सापडली. तणावातून आत्महत्या करत …

जाहिरात एजन्सीची 'क्वीन' भूमिका सिंहची आत्महत्या

मुंबई : जाहिरात एजन्सीत काम करणाऱ्या भूमिका सिंह हिने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. मुंबईतील वाकोला परिसरातील या घटनेने जाहिरात क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. भूमिका सिंहचे वय 30 वर्षे होते. तणावातून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज असला, तरी नेमकं कारण अद्याप कळू शकलेलं नाही.

भूमिका सिंह हिच्या मृतदहेजवळ पोलिसांनी एक डायर सापडली. तणावातून आत्महत्या करत असल्याचे त्या डायरीत म्हटले आहे. मात्र, कोणत्या गोष्टीचा तणाव होता, याचा उल्लेख कुठेच नाही. त्यामुळे अनेक शक्यता पोलिस तपासून पाहत आहेत. तसेच, माझ्या बँक अकाऊंटमध्य पाच लाख रुपये बॅलन्स असून, ते पैसे माझ्या वडिलांना द्या, त्यांची आर्थिक स्थिती चांगली नाही, असेही भूमिका सिंहने तिच्या डायरीत लिहिले आहे.

भूमिका सिंह ही मूळची उत्तर प्रदेशातील असून, नोकरीनिमित्त मुंबईत आली होती. मुंबईतील प्रसिद्ध जाहिरात एजन्सीत ती काम करत होती. तीनच वर्षांपूर्वी भूमिकाचं लग्न झालं होतं. तिचा पतीही तिच्याच जाहिरात एजन्सीतच काम करत होता.

दरम्यान, भूमिकाच्या नातेवाईकांनी अद्याप कुणाच्याही विरोधात तक्रार दाखल केली नाही. मात्र, वाकोला पोलिसांनी तपास सुरु केला आहे. दुसरीकडे, तणावासोबतच वडिलांच्या आर्थिक स्थितीचीही तिला काळजी होती, असे डायरीतून समोर आल्याने, भूमिकाच्या आत्महत्येच्या नेमक्या कारणाबद्दल गूढ कायम आहे.

बातमीचा व्हिडीओ :

 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *