कुलभूषण जाधवांना सोडवू, पण 26/11 ला स्ट्राईक का केला नाही? : तावडे

मुंबई: पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारताचे कुलभूषण जाधव यांना सोडवलं जाईल, तुम्ही चिंता करु नका, असं प्रत्युत्तर भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना दिले. कुलभूषण जाधव यांना सोडवण्यात 56 इंच छातीवाले अपयशी ठरले, असा घणाघात शरद पवार यांनी कालच्या कराडमधील महाआघाडीच्या सभेत केला होता. त्याला भाजप नेते आणि राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी उत्तर दिलं. …

कुलभूषण जाधवांना सोडवू, पण 26/11 ला स्ट्राईक का केला नाही? : तावडे

मुंबई: पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारताचे कुलभूषण जाधव यांना सोडवलं जाईल, तुम्ही चिंता करु नका, असं प्रत्युत्तर भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना दिले.

कुलभूषण जाधव यांना सोडवण्यात 56 इंच छातीवाले अपयशी ठरले, असा घणाघात शरद पवार यांनी कालच्या कराडमधील महाआघाडीच्या सभेत केला होता. त्याला भाजप नेते आणि राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी उत्तर दिलं. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.

पवारांनी कुलभूषण जाधव यांना का सोडवलं नाही असा प्रश्न विचारला. मात्र कूलभूषण जाधव यांना पाकिस्तानने फाशीची शिक्षा सुनावली होती. त्याबाबतचा खटला सुरु आहे. आता कुलभूषण जाधव यांना सोडवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्यांना त्यातून सोडवलं जाईल तुम्ही चिंता करु नका, असं विनोद तावडे म्हणाले.

शरद पवार यांचा दुटप्पीपणा आहे, जेव्हा हल्ला होतो, तेव्हा पंतप्रधान मोदींवर, सरकारवर टीका केली जाते. मात्र जेव्हा आम्ही एअर स्ट्राईक करतो, तेव्हा राजकीय श्रेय घेतो असा आरोप केला जातो, हा सरळ दुटप्पीपणा आहे, अशी टीका तावडेंनी केली.

26/11 वेळी स्ट्राईक करायला का घाबरलात?

मुंबईवर 26/11 हल्ला झाला, त्यानंतर सर्जिकल स्ट्राईक करायला का घाबरलात असा सवाल, विनोद तावडेंनी पवारांना केला. मुंबई बॉम्बस्फोटाचा मास्टरमाईंड दाऊदला जर भारतात परत यायचं आहे, तर त्याला का भारतात आणलं गेलं नाही. प्रकाश आंबेडकर जे बोलतात ते खरे आहे, याबाबत शरद पवार का बोलत नाहीत, असा सवालही तावडेंनी केला.

काँग्रेसमध्ये शोकपर्व

यावेळी काँग्रेसमधील सध्यस्थितीवर तावडेंनी भाष्य केलं.  माजी मुख्यमंत्री वसंतदादांचे नातू प्रतीक पाटील यांनी काँग्रेस पक्ष सोडला, विखे पाटील यांचे चिरंजीव आले, प्रिया दत्त सुद्धा इच्छा नसताना लढत आहेत, अब्दुल सत्तर सोडून चालले, काँग्रेसला पुण्यात उमेदवार मिळत नाही, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना मनाविरोधात लढावं लागतं, त्यामुळे आता काँग्रेसमध्ये शोक पर्व  सुरु आहे, अशी टीका विनोद तावडे यांनी केली.

संबंधित बातम्या 

उदयनराजेंसाठी आघाडीतले सर्व नेते एकवटले!  

कोल्हापुरात उद्धव ठाकरे-फडवीसांची तोफ धडाडली!  

माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटलांची काँग्रेसला सोडचिठ्ठी   

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *