भाजप आमदार प्रसाद लाड यांना कोरोनाची लागण, संपर्कात आलेल्यांना चाचणी करण्याचं आवाहन

भाजप आमदार प्रसाद लाड यांना कोरोनाची लागण झाली आहे (BJP MLA Prasad Lad tested Corona Positive).

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 18:09 PM, 19 Nov 2020

मुंबई : भाजप आमदार प्रसाद लाड यांना कोरोनाची लागण झाली आहे. ते सध्या रुग्णालयात आयसोलेशनमध्ये आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घेत आहे. प्रसाद लाड यांनी स्वत: ट्विटरवर याबाबत माहिती दिली आहे. याशिवाय गेल्या काही दिवसात संपर्कात आलेल्या सर्वांना त्यांनी कोरोना चाचणी करण्याची विनंती केली आहे (BJP MLA Prasad Lad tested Corona Positive(.

“माझी कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली असून, सध्या मी आयसोलेशनमध्ये आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे हॉस्पिटलमध्ये औषधोपचार घेत आहे. मागील काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना माझी विनंती आहे, स्वत:ची काळजी घ्या. आवश्यक वाटत असेल, तर स्वतःची चाचणी करुन घ्यावी”, असं प्रसाद लाड ट्विटरवर म्हणाले आहेत.

एकनाथ खडसेही कोरोना पॉझिटिव्ह

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. खडसे उपचारासाठी मुंबईकडे रवाना झाले आहेत. माझ्या सान्निध्यात आलेल्या लोकांनी कोरोनाची चाचणी करून घ्यावी, तसेच मी बरा होईपर्यंत भेटण्यास येऊ नये, असं आवाहनही एकनाथ खडसे यांनी केलं आहे. एकनाथ खडसे यांनी स्वत: ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली आहे.

राज्यात कोरोना संसर्गात पुन्हा वाढ

राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्ण्यांच्या संख्येत बऱ्यापैकी घट झाली होती. पण काल (18 नोव्हेंबर) राज्यात कोरोनाचे तब्बल 5 हजार 11 नवे रुग्ण आढळले होते. त्यामुळे चिंता वाढली आहे. राज्य सरकारने पुढच्या काही दिवसात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांना काळजी घेणं जरुरीचं आहे. राज्यात अजूनही 80 हजार पेक्षा जास्त रुग्णांवर उपचार सुरु आहे.

संबंधित बातम्या :

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांना कोरोनाची लागण