ऐतिहासिक! सत्ताधारी भाजपचा काँग्रेस कार्यालयावर मोर्चा

मुंबई: मोदी आणि फडणवीस सरकारच्या काळात ऐतिहासिक घटना घडत आहेत. शेतकरी संप असो वा अन्य कोणतीही आंदोलने या सरकारने पाहिली. त्यातच आता सत्ताधारी भाजपने प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसच्या कार्यालयावर मोर्चा काढण्याचा पराक्रम केला. “राफेल खरेदी व्यवहारप्रकरणी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी खोटे दावे करत आहेत. तसंच ते देशाचा आणि पंतप्रधान मोदींचा अपमान करत आहेत”, असा …

ऐतिहासिक! सत्ताधारी भाजपचा काँग्रेस कार्यालयावर मोर्चा

मुंबई: मोदी आणि फडणवीस सरकारच्या काळात ऐतिहासिक घटना घडत आहेत. शेतकरी संप असो वा अन्य कोणतीही आंदोलने या सरकारने पाहिली. त्यातच आता सत्ताधारी भाजपने प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसच्या कार्यालयावर मोर्चा काढण्याचा पराक्रम केला. “राफेल खरेदी व्यवहारप्रकरणी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी खोटे दावे करत आहेत. तसंच ते देशाचा आणि पंतप्रधान मोदींचा अपमान करत आहेत”, असा आरोप करत भाजपने काँग्रेस कार्यालयावर आज मोर्चा काढला. तसंच राहुल गांधी यांच्या फोटोला काळं फासलं.

 

आमदार राज पुरोहित यांच्यासह विविध नेत्यांनी काढलेल्या या मोर्चात भाजपचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. राहुल गांधी चोर है, अशा घोषणा यावेळी भाजप कार्यकर्ते देत होते.

सुप्रीम कोर्टाने राफेल व्यवहारात काहीही गैर नसल्याचा निर्णय दिला आहे, त्यामुळे राहुल गांधी आणि काँग्रेसने सुप्रीम कोर्टाचा मान राखावा. त्यांनी देशाची आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची माफी मागावी, अशी मागणी भाजप आमदार राज पुरोहित यांनी केली.

यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी राहुल गांधींच्या फोटोला काळं फासलंच, शिवाय बॅरिकेट्स तोडून काँग्रेस कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *