पैसे घेतले पण बसच सोडली नाही, विरारमध्ये भाजपकडून गणेशभक्तांची फसवणूक

कोकणातील चाकरमान्यांसाठी गणेशोत्सव हा सण महत्त्वाचा असतो. मात्र अशाप्रकारे पैसे घेऊन व्यवस्था न झाल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. त्यांनी पक्षाच्या नावाखाली फसवणूक झाल्याचा आरोपही यावेळी केला आहे.

पैसे घेतले पण बसच सोडली नाही, विरारमध्ये भाजपकडून गणेशभक्तांची फसवणूक
Follow us
| Updated on: Sep 01, 2019 | 1:52 PM

विरार : विधानसभा निवडणुकीच्या (Assembly election) पार्श्वभूमीवर मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजप-शिवसेनेने (BJP Shivsena) कोकणातील गणेश भक्तांसाठी (Konkan Ganpati Festival) नालासोपाऱ्यात अल्पदरात बस सेवा राबवली होती. नालासोपारा विधानसभेतील मतदारांचे आधारकार्ड, रेशनकार्ड घेऊन प्रति माणसाकडून 100 ते 500 रुपये घेऊन एक महिन्यापासून तिकीट बुकिंग केली होती. याबाबत अनेक ठिकाणी शिवसेना भाजपाने बॅनरबाजी करण्यात आली. कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी (Konkan Ganpati Festival) शिवसेनेने काल 30 बस  सोडल्या. मात्र भाजपकडून अद्याप कोकणात जाणारी एकही बस सोडलेली नाही. यामुळे 500 हून अधिक भाविक विरारमध्ये अडकून (BJP cheated Ganesh devotees) पडले आहेत.

विरार पूर्व मनवेल पाडा परिसरात ओम रेजनशी या इमारतीमध्ये भाजपच्या कामगार आघाडीने कार्यालय थाटून कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांची अल्पदरात बुकिंग चालू होती. भारतीय जनता पार्टी कामगार आघाडीच्या माध्यमातून कोकण व्हिजन (Konkan Vision) या नावाखाली 550 ते 600 रुपये प्रति सीट अशी जवळपास 2 हजार कोकणात जाणाऱ्या नागरिकांची बुकिंग केली.

स्वस्त आणि घरापासून जवळ असल्याने अनेकांनी एक महिन्यांपूर्वी पैसे भरुन बुकिंग केले. याची रितसर पावतीही त्यांना देण्यात आली. त्यानुसार बुकींग केलेले अनेक चाकरमानी ठरलेल्या वेळेनुसार कार्यालयाजवळ जमले. पण रात्री 8 वाजल्यापासून अनेक जण बसमध्ये बसलेले आहे. ज्यांनी बुकिंग घेतले त्यांच्याकडून कोणतेही उत्तर मिळत नसल्याने नागरिक संतप्त झाले आहे.

कोकणातील सावंतवाडी, देवरुख, लांजा, राजापूर, रत्नागिरी, संगमेश्वर, मालवण, तरळी, कणकवली, गणपतीपुळे, दापोली, गुहागर, चिपळूण, महाड, देवगड, वेंगुर्ले, साखरपार, सावर्डे या ठिकाणी जाणारे आहेत.

यामुळे नागरिकांनी भाजप कार्यकर्त्यांना पकडून विरार पोलिसांच्या ताब्यात देत पोलीस ठाण्यासमोरच घेराव घातला होता. या सर्व प्रकारानंतर वसई विरार महापालिकेचे स्थायी समिती सभापती प्रशांत राऊत यांनी या लोकांची भेट घेत, बसची व्यवस्था करण्याचे आश्वासन दिले. पण रात्रीची वेळ असल्याने तात्काळ बस मिळणेही कठीण झाले होते,

कोकणातील चाकरमान्यांसाठी गणेशोत्सव हा सण महत्त्वाचा असतो. मात्र अशाप्रकारे पैसे घेऊन व्यवस्था न झाल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. त्यांनी पक्षाच्या नावाखाली फसवणूक झाल्याचा आरोपही यावेळी केला आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.