मुंबईत कचऱ्याचे ढिग, सफाई कर्मचाऱ्यांचं आंदोलन

मुंबई: सफाई कामगारांनी कामबंद आंदोलन सुरु केल्यामुळे मुंबईत कचऱ्याचे ढिग पाहायला मिळत आहेत. कचरा उचलण्याचे काम करणाऱ्या पालिकेचे कायमस्वरूपी आणि कंत्राटी कामगारांनी हे काम बंद आंदोलन सुरु केलं आहे. महापालिकेने कचरा गोळा करुन डम्पिंग ग्राऊंडपर्यंत पोहोचवण्याचे काम पूर्णपणे कंत्राटदाराकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाविरोधात सफाई कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचं हत्यार उपसलं आहे. त्याचा परिणाम म्हणून मुंबईच्या …

मुंबईत कचऱ्याचे ढिग, सफाई कर्मचाऱ्यांचं आंदोलन

मुंबई: सफाई कामगारांनी कामबंद आंदोलन सुरु केल्यामुळे मुंबईत कचऱ्याचे ढिग पाहायला मिळत आहेत. कचरा उचलण्याचे काम करणाऱ्या पालिकेचे कायमस्वरूपी आणि कंत्राटी कामगारांनी हे काम बंद आंदोलन सुरु केलं आहे. महापालिकेने कचरा गोळा करुन डम्पिंग ग्राऊंडपर्यंत पोहोचवण्याचे काम पूर्णपणे कंत्राटदाराकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाविरोधात सफाई कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचं हत्यार उपसलं आहे. त्याचा परिणाम म्हणून मुंबईच्या सर्व 24 वॉर्डमध्ये कचराकोंडी झाली आहे. कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत आहे. त्यामुळे या आंदोलनावर तातडीने तोडगा काढण्याची मागणी होत आहे.

महापालिकेने बुधवारपासून सफाईचं काम कंत्राटदाराकडे सोपवलं आहे. मात्र अनेक वर्षांपासून महापालिकेकडे कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्याचा फटका बसणार आहे. कंत्राटदार आपले कर्मचारी त्याठिकाणी लावू शकतो, असा या कर्मचाऱ्यांचा अंदाज आहे. शिवाय कायमस्वरुपी सफाई कामगारांना अन्य विभागांमध्ये सामावून घेतले जाणार आहे. या सर्व निर्णयाला सफाई कर्मचाऱ्यांचा विरोध आहे.

त्यामुळेच कर्मचाऱ्यांनी आजपासून मुंबईत कुठेही कचरा उचलणार नाही असा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुंबईत आज कचऱ्याचे ढिग आणि दुर्गंधी पसरली आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *