7 दिवसात 26 लाखांची दंडवसुली, नो पार्किंगमधील गाड्यांना दणका, महापौरांचीही पावती फाडली

मुंबईतील ट्रॅफिकला शिस्त लावण्यासाठी महापालिकेने नवे नियम आणले आहेत. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली. गेल्या सात दिवसात नो पार्किंगमध्ये गाड्या पार्क करणाऱ्या 505 वाहनचालकांना दणका देत दंड वसूल करण्यात आला.

7 दिवसात 26 लाखांची दंडवसुली, नो पार्किंगमधील गाड्यांना दणका, महापौरांचीही पावती फाडली

मुंबई : नो- पार्किंगमध्ये गाड्या पार्क करणाऱ्या वाहनचालकांना, वाहतूक विभागाने दणका दिला आहे. केवळ सात दिवसांत तब्बल 25 लाख 79 हजार 630 रुपयाचा दंड वसूल करण्यात आला. मुंबईतील ट्रॅफिकला शिस्त लावण्यासाठी महापालिकेने नवे नियम आणले आहेत. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली. गेल्या सात दिवसात नो पार्किंगमध्ये गाड्या पार्क करणाऱ्या 505 वाहनचालकांना दणका देत दंड वसूल करण्यात आला.

मुंबई महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पहिलं काम वाहतुकीला शिस्त लावण्याचं हाती घेतलं आहे. त्यानुसार पार्किंगपासून 500 मीटरपर्यंत कुठेही बेकायदा वाहने लावून जाणाऱ्यांना 1 ते दहा हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे. 7 जुलैपासून हा नियम लागू झाला आहे.

महापौरांच्या गाडीवरही कारवाई

नो पार्किंगमध्ये कार पार्क करणाऱ्या मुंबईच्या महापौरांना ट्रॅफिक पोलिसांनी ई- चलन पाठवलं आहे. रविवारी महापौरांनी विले पार्ले इथं नो पार्किंग झोनमध्ये कार पार्क केली होती. त्यामुळे महापौरांकडून पालिका दंड आकारणार का असा सवाल सोमवारी दिवसभर TV9 ने लावून धरला. दरम्यान, नो पार्किंग झोनमध्ये गाडी पार्क केली नव्हती, तर उतरण्यासाठी गाडी तिथे थांबवली होती, त्यामुळे नियमांचं उल्लंघन झाल्याचं म्हणता येणार नाही, असं स्पष्टीकरण विश्वनाथ महाडेश्वर यांनी दिलं होतं. तसंच पावती आल्यास दंडाची रक्कम भरली जाईल असंही महापौरांनी सांगितलं. आता महापौरांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली असून त्यांना ई चलन पाठवण्यात आलं आहे.

महापालिकेने  146 ठिकाणी जवळपास 34 हजार 808 वाहने पार्क करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. पहिल्या टप्प्यात 23 वाहनतळाजवळच्या परिसरात कारवाई केली जात आहे.

दरम्यान, महापालिकेने ही कारवाई केली असली, तरी वाहनचालक आता हळूहळू त्याला विरोध करत आहेत. अवाजवी दंड आणि पार्किंगस्थळांची नीट माहिती नसल्याचा दावा वाहनचालक करत आहेत. शिवाय स्थानिक रहिवाशांनी घराजवळ गाडी लावल्यावर कारवाई झाल्याने अशाप्रकारच्या कारवाईला विरोध केला आहे.

सात दिवसात किती वाहनांवर कारवाई

  • 505 वाहनांवर कारवाई
  • दुचाकी 238
  • तीन चाकी 17
  • चार चाकी 250
  • एकूण दंड वसूल- 25 लाख 79 हजार 630 रुपये

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *