मास्‍क नसल्‍यास ‘बेस्‍ट बस’ सह टॅक्‍सी, रिक्षामध्‍ये प्रवेश न देण्‍याचे आदेश, पालिका आयुक्तांचे निर्देश

मास्क नसल्यास सर्व बसेस,टॅक्‍सी, रिक्षा इत्‍यादीमध्ये प्रवाशांना प्रवेश देऊ नये, असे आदेश आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिलेत. (Iqbal chahal order about use of mask)

मास्‍क नसल्‍यास ‘बेस्‍ट बस’ सह टॅक्‍सी, रिक्षामध्‍ये प्रवेश न देण्‍याचे आदेश, पालिका आयुक्तांचे निर्देश

मुंबई:कोरोना विषाणू संसर्गावर निंयत्रण मिळवण्यासाठी मास्क वापरण्यासंदर्भात जनजागृती सोबत मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिलेत. मास्क नसल्यास सर्व बसेस,टॅक्‍सी, रिक्षा इत्‍यादीमध्ये प्रवाशांना प्रवेश देऊ नये. वाहनांमध्ये ‘मास्‍क नाही, प्रवेश नाही’; ‘नो मास्‍क, नो एन्‍ट्री’, अशा आशयाचे स्‍टीकर्स लावण्‍याचे निर्देश आयुक्तांनी दिलेत. या आदेशांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यास सांगण्यात आलेय.

बृहन्‍मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्व कार्यालये, आस्‍थापना, मॉल्‍स, सोसायटी, सभागृह इत्‍यादी ठिकाणी ‘मास्‍क नाही, प्रवेश नाही’; ‘नो मास्‍क, नो एन्‍ट्री’ अशा आशयाचे फलक लावण्‍याचे निर्देश बैठकीत देण्यात आले आहेत.

बृहन्‍मुंबई महापालिका क्षेत्रात देखील नागरिकांद्वारे मास्‍कचा सुयोग्‍य व परिपूर्ण वापर व्‍हावा, यासाठी बृहन्‍मुंबई महापालिका सातत्‍याने जनजागृतीपर कार्यवाही करत आहे. मात्र, त्‍याचबरोबर सार्वजनिक ठिकाणी मास्‍क योग्‍यप्रकारे परिधान न करणाऱयांवर प्रत्‍येक वेळी, प्रत्‍येक ठिकाणी रुपये २००/- यानुसार दंडात्‍मक कारवाईदेखील यापूर्वीच सुरू करण्‍यात आली आहे. ही कारवाई अधिक व्‍यापक व तीव्र करण्‍याचे निर्देश महापालिका आयुक्‍तांनी दिले.

महापालिका आयुक्‍त इक्‍बाल सिंह चहल यांच्‍या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे झाली. बैठकीला अतिरिक्‍त महापालिका आयुक्‍त (प्रकल्‍प) पी. वेलरासू, अतिरिक्‍त महापालिका आयुक्‍त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी  उपस्थित होते. महापालिकेचे सह आयुक्‍त, उप आयुक्‍त, सहाय्यक आयुक्‍त, महापालिका रुग्‍णालयांचे अधिष्‍ठाता, सार्वजनिक आरोग्‍य खात्‍यातील वैद्यकीय अधिकारी आणि महापालिकेच्‍या विविध विभागांचे अति वरिष्‍ठ अधिकारी उपस्थित होते.

संबंधित बातम्या:

गळ्यात चेन, डोळ्याला गॉगल, मग तोंडाला मास्क का नाही? मास्क न घालणारे किलर : महापौर

किरीट सोमय्या पोलिसांच्या ताब्यात, मुंबईच्या महापौरांविरोधात ठिय्या आंदोलनामुळे कारवाई

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *