मनपा शाळेत शिकणाऱ्यांना हमखास नोकरी, ठराव मंजूर!

मुंबई: मुंबई महापालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या प्रत्येकाला नोकरीची शाश्वती मिळणार आहे. महापालिका शाळेत शिकलेल्या विद्यार्थ्यांना आता पालिकेच्या नोकर भरतीत प्राधान्य मिळणार आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या शाळेत शिकणाऱ्यांना नोकरीची हमी मिळली आहे. याबाबत शिवसेनेच्या मागणीला सभागृहाची मंजुरी मिळाली आहे. या निर्णयामुळे पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांची गळती रोखण्यासही मदत होईल, शिवाय पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना भविष्यात नोकरीही मिळेल. महापालिकेच्या शाळांतून शिक्षण …

मनपा शाळेत शिकणाऱ्यांना हमखास नोकरी, ठराव मंजूर!

मुंबई: मुंबई महापालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या प्रत्येकाला नोकरीची शाश्वती मिळणार आहे. महापालिका शाळेत शिकलेल्या विद्यार्थ्यांना आता पालिकेच्या नोकर भरतीत प्राधान्य मिळणार आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या शाळेत शिकणाऱ्यांना नोकरीची हमी मिळली आहे. याबाबत शिवसेनेच्या मागणीला सभागृहाची मंजुरी मिळाली आहे. या निर्णयामुळे पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांची गळती रोखण्यासही मदत होईल, शिवाय पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना भविष्यात नोकरीही मिळेल.

महापालिकेच्या शाळांतून शिक्षण घेतलेल्या मुलांना पालिका सेवेत प्राधान्य देण्याबाबतचा निर्णय  घेतल्यानं, पाल्यांना पालिकेच्या शाळेत दाखल करण्याचा पालकांचा कलही वाढेल, असा विश्वास आहे.

पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांची गळती रोखण्याकरिता आणि शाळाबाह्य मुलांना शालेय शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.  शिक्षणाची आवड आणि दर्जा सुधारावा, याकरिता माजी विद्यार्थ्यांना ब्रँडअँबेसिडर नेमण्यात येणार आहेत. आयुक्तांच्या अभिप्रायानंतर या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. त्यामुळे, आयुक्त या निर्णयाला मंजुरी देतात का हे पहाणं महत्वाचं आहे.

महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना शिक्षणाचा दर्जा आणि  नोकरीची शाश्वती नसल्यामुळे, मनपा शाळांकडे विद्यार्थी आणि पालकांची पाठ असते. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, त्यांना नोकरीमध्येही प्राधान्य दिलं जात नाही. मात्र आता थेट महापालिकेनेच याबाबतचा निर्णय घेतल्याने, विद्यार्थी आणि पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *