खड्ड्यांमुळे जखमी किंवा मृत्यू झाल्यास BMC मदत करणार नाही!

मुंबई : मुंबईतल्या रस्त्यांची अवस्था पाहिल्यास रस्त्यांवर खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ते, असा प्रश्न कुणाला पडल्यावाचून राहणार नाही. दरवर्षी पावसाळ्याआधी खड्डे बुजवण्याचा देखावा केला जातो, मात्र हा देखावसुद्धा किती फसवा असतो, हेही अनेकदा समोर आले आहे. या खड्ड्यामुळे आतापर्यंत अनेकजण जखमी झाले आहेत, तर दुर्दैवाने अनेकांचे जीवही गेले आहेत. मात्र, मुंबई महानगरपालिकेला कसलाही फरक पडत …

खड्ड्यांमुळे जखमी किंवा मृत्यू झाल्यास BMC मदत करणार नाही!

मुंबई : मुंबईतल्या रस्त्यांची अवस्था पाहिल्यास रस्त्यांवर खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ते, असा प्रश्न कुणाला पडल्यावाचून राहणार नाही. दरवर्षी पावसाळ्याआधी खड्डे बुजवण्याचा देखावा केला जातो, मात्र हा देखावसुद्धा किती फसवा असतो, हेही अनेकदा समोर आले आहे. या खड्ड्यामुळे आतापर्यंत अनेकजण जखमी झाले आहेत, तर दुर्दैवाने अनेकांचे जीवही गेले आहेत. मात्र, मुंबई महानगरपालिकेला कसलाही फरक पडत नसल्याचेच आता समोर आले आहे.

खड्ड्यांमुळे कुणीही जखमी झाल्यास, त्याला आर्थिक मदत दिली जाणार नाही, तसेच कुणाचा मृत्यू झाल्यास, मृताच्या नातेवाईकांनाही आर्थिक मदत दिली जाणार नाही, असे मुंबई महापालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

मुंबई महापालिकेने हात झटकले!

रस्त्यांवरील खड्डे, झाकणरहित मॅनहोल, गटारे यांच्यात पडून जखमी अथवा मृत झाल्यास भरपाई देण्याची शिवसेना नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांनी ठरवा मांडला होता. मात्र, शिवसेना नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या ठरावाला केराची टोपली दाखवत, महापालिकेने ठराव नाकारला. “रस्त्यांवरील मॅनहोल व खड्ड्यांमुळे अपघातात मृत्यू अथवा जखमी झाल्यास अशा व्यक्तींना मदत किंवा त्यांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत देण्यास प्रशासन बांधील नाही”, असे मुंबई महापालिकेने स्पष्ट केले. तसेच, भरपाई देण्याबाबतचे धोरण अवलंबणे शक्य होणार नाही, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

सत्ताधारी नगरसेवकाच्या ठरावालाच केराची टोपली!

विशेष म्हणजे, खड्ड्यांमुळे जखमी किंवा मृत्यू झाल्यास आर्थिक मदत देण्याचा ठराव मुंबई महापालिकेत सत्तेत असलेल्या शिवसेनेच्या नगरसेवकानेच म्हणजेच अभिषेक घोसाळकर यांनीच मांडला होता. मात्र, सत्ताधाऱ्यांच्याच ठरावाला प्रशासने केराची टोपली दाखवली आहे. या कारणामुळे सुद्धा सध्या महापालिकेत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *