… तर संघर्ष अटळ, उत्तर भारतीयांच्या व्यासपीठावरुन 'राज गर्जना'

मुंबई : कोणतंही राज्य असो, तिथल्या स्थानिकांना रोजगारात प्राधान्य मिळावं, ही भूमिका अगोदरपासून होती आणि ती कायम असेल. फक्त हे सर्व हिंदीतून समजावून सांगण्यासाठी आलोय, असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उत्तर भारतीय महापंचायतीच्या व्यासपीठावरुन त्यांची भूमिका मांडली. नीट सांगितलेलं समजत नसेल, तर संघर्ष अटळ आहे, असा इशाराही त्यांनी दिला. शिवाय आंतरराज्य कायदा समजून […]

... तर संघर्ष अटळ, उत्तर भारतीयांच्या व्यासपीठावरुन 'राज गर्जना'
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:55 PM

मुंबई : कोणतंही राज्य असो, तिथल्या स्थानिकांना रोजगारात प्राधान्य मिळावं, ही भूमिका अगोदरपासून होती आणि ती कायम असेल. फक्त हे सर्व हिंदीतून समजावून सांगण्यासाठी आलोय, असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उत्तर भारतीय महापंचायतीच्या व्यासपीठावरुन त्यांची भूमिका मांडली. नीट सांगितलेलं समजत नसेल, तर संघर्ष अटळ आहे, असा इशाराही त्यांनी दिला. शिवाय आंतरराज्य कायदा समजून घेण्याचं आवाहनही केलं. उत्तर भारतीय जिथे जातो, तिथे त्यांना अपमानास्पद वागणूक मिळते, मारहाण केली जाते. तुम्हालाही स्वाभिमान आहे की नाही? याबद्दल कधी तुमच्या नेत्यांना विचारणार आहात का? असा सवाल राज ठाकरेंनी केला. यूपी, बिहारच्या नेत्यांनी स्थानिकांसाठी रोजगार आणले नसल्यामुळे आज ही वेळ आली असल्याचं राज ठाकरे म्हणाले. रेल्वे भरती आंदोलनाच्या वेळी जे झालं, त्यावरही राज ठाकरेंनी भूमिका मांडली. लालू प्रसाद यादव रेल्वे मंत्री असताना महाराष्ट्रातील जागेच्या जाहिराती यूपी आणि बिहारमध्ये आल्या, पण महाराष्ट्राला त्याची माहितीही नाही. याचा जाब संबंधितांना विचारल्यानंतर जी वागणूक मिळाली, त्यानंतर त्यांची आरती करायची होती का? असा सवाल राज ठाकरेंनी केला. “राजकारण्यांनी उत्तर भारतासाठी काय केलं” या देशात जेवढे पंतप्रधान झाले, त्यातील 70-80 टक्के उत्तर प्रदेशातून होते. पंडित जवाहरलाल नेहरु, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचा मतदारसंघही उत्तर प्रदेशात आहे. अटल बिहारी वाजपेयी आणि सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघही उत्तर प्रदेशात आहे, पण स्थानिकांसाठी कुणी काहीही करु शकलं नाही, असं राज ठाकरे म्हणाले. “इतर राज्यातली परिस्थिती दिसत नाही का?” राज्यात माझ्या महाराष्ट्रातील तरुण-तरुणींना प्राधान्य मिळावं, कोणत्याही राज्यात जाता तेव्हा त्या राज्यातील भाषा शिकावी, परदेशात जाता तेव्हा हिंदीत बोलता का? महाराष्ट्रात जे झालं, ते देशात वेगळ्या पद्धतीने दाखवण्यात आलं, इतर राज्यातलं दिसत नाही का? महाराष्ट्रात तर काहीच झालं नाही, आसाममध्ये बिहारच्या तरुणाचं मुंडकं कापलं होतं, बिहारी हटाओ आंदोलन तिथे झालं, पण त्याविषयी कुणी काही बोललं नाही, अस सांगत मनसेला देशपातळीवर चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आल्याचं राज ठाकरे म्हणाले. “फेरीवाला संघर्षाला उत्तर भारतीय नेते जबाबदार” फेरीवाल्यांविरोधातील जे आंदोलन झालं त्यावरही राज ठाकरेंनी भूमिका मांडली. उत्तर भारतीयांच्या नेत्यांनी जी आग लावली, त्यानंतर संघर्ष पेटला असं ते म्हणाले. अनधिकृतपणे व्यवसाय करण्यास मराठी फेरीवाल्यांनाही बंदी आहे, अशी भूमिका त्यांनी मांडली. “… तर सहन करणार नाही” उद्योग यूपी, बिहारमध्येही जावेत, तिथेही रोजगार मिळावेत. पण तिथून निघतात आणि इथे मुंबईत येतात, यूपी, बिहार आणि झारखंडमधून मुंबईत दररोज 48 ट्रेन भरून येतात आणि रिकाम्या जातात. प्रत्येक शहराची एक क्षमता असते, इथे मुलांना मराठी माणसांच्या मुलांना अॅडमिशन मिळत नाहीत, फुटपाथवार चालायला जागा नाही, फक्त लोकसंख्या वाढतेय. महाराष्ट्र पोलिसांचा सर्वात जास्त वेळ कुठे जातो हे त्यांना विचारा, यूपी, बिहार, झारखंडच्या सीमेवर सर्वाधिक चौकशी सुरु. इथे येतात आणि अपराध करुन जातात, असंही राज ठाकरे म्हणाले. महाराष्ट्रात अशी परिस्थिती नव्हती, पण 1995 ला झोपडपट्टीवाल्यांना मोफत घर ही योजना आली आणि फुकट घरांसाठी जास्त लोकसंख्या आली. बाहेरुन कुणीही येतो आणि टॅक्सी चालवता चालवता आमच्या आई-बहिणींना शिव्या देतात. आम्ही हे सहन करणार नाही. महाराष्ट्रातील मुस्लीम राहतात तिथे दंगली कधीही होत नाहीत. आझाद मैदानातील मोर्चात जो प्रकार झाला होता, त्यात बाहेरुन आलेले मुस्लीम होते, हेच तुमच्या यूपी किंवा बिहारमध्ये झालं तर काय कराल? असा सवाल राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांना केला. 60 च्या दशकात मुंबईत दक्षिण भारतीयांविरोधात संघर्ष झाला होता, पण त्यांच्या नेत्यांनी उद्योग आणले आणि त्यांचं मुंबईत येणं बंद झालं. महाराष्ट्रातल्या तरुणांना रोजगार नाही आणि बाहेरुन आलेल्यांना कामं मिळत असतील तर संघर्ष होणार की नाही हे तुम्हीच सांगा. मी इथे जे बोलतो, ते दिल्लीतून वेगळं दाखवलं जातं, टीआरपीसाठी राज्या-राज्यांमध्ये संघर्ष पेटवला जातोय, असं म्हणत राज ठाकरेंनी हिंदी मीडियावरही निशाणा साधला. ”बिग बींना त्यांच्या राज्याविषयी प्रेम, मला विरोध का?” बिग बी अमिताभ बच्चन लोकसभा निवडणूक लढले, तेव्हा त्यांनी उत्तर प्रदेशची निवड केली. सूनेच्या नावाने शाळा सुरु करायची होती, तर उत्तर प्रदेशमध्ये जागा विकत घेतली. त्यांच्यासारख्या व्यक्तीला जन्मभूमीविषयी एवढं प्रेम असेल तर राज ठाकरेला विरोध का? हीच माझी भूमिका होती आणि हीच भूमिका असेल, असं राज ठाकरेंनी स्पष्ट केलं. VIDEO : राज ठाकरे यांचं संपूर्ण भाषण

Non Stop LIVE Update
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?.
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध.
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?.