VIDEO ग्रॅण्डमस्ती अंगलट, खवळलेल्या समुद्राने कार ओढून नेली

खवळलेला समुद्र या गाड्या आतमध्ये कसा ओढून नेतो हे एका व्हायरल झालेल्या व्हिडीओवरुन समोर आले आहे. हा व्हिडीओ विरार परिसरातील नवापूर समुद्र किनाऱ्यावरील आहे.

VIDEO ग्रॅण्डमस्ती अंगलट, खवळलेल्या समुद्राने कार ओढून नेली

विरार : खवळलेल्या समुद्रकिनारी चारचाकी गाडी नेणं चांगलंच महागात पडलं आहे. हौशी पर्यटकांची गाडी समुद्राच्या लाटांमध्ये अडकल्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरु झाले आहेत. पावसाच्या आगमनाने समुद्र खवळत आहे. पण हौशी पर्यटक याची कोणतीच पर्वा न करता चक्क समुद्र किनाऱ्यावर टू व्हीलर, 4 व्हीलर गाड्या समुद्र किनारी घेऊन जातात.

मात्र खवळलेला समुद्र या गाड्या आतमध्ये कसा ओढून नेतो हे एका व्हायरल झालेल्या व्हिडीओवरुन समोर आले आहे. हा व्हिडीओ विरार परिसरातील नवापूर समुद्र किनाऱ्यावरील आहे. काल रविवारी  दुपारच्या वेळेत अर्टिगा कार घेऊन काही पर्यटक  आले होते. हे हौशी पर्यटक कार चक्क समुद्रात घेऊन गेले होते. पण अचानक आलेल्या भरतीने ही कार समुद्रातच अडकून पडली.

कार बाहेर येत नसल्याने ती बाहेर काढण्यासाठी ट्रॅकरची मदत घ्यावी लागली. पण ट्रॅक्टरनेही ती बाहेर निघाली नाही. शेवटी समुद्राच्या लाटात ती वाहत असतानाही दिसत होती. अखेर कशीबशी ही कार बाहेर काढण्यात आली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. पण ही ग्रॅण्डमस्ती या हौशी पर्यटकांना चांगलीच अंगलट आली.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *