महिन्याला 45 हजार रुपये मानधन, 'मुख्यमंत्री फेलोशिप'साठी अर्ज करण्यासाठी शेवटचे दोन दिवस

21 ते 26 वयोगटातील, प्रथम वर्ग पदवीधर आणि पूर्णवेळ कामाचा एक वर्षाचा अनुभव असलेला भारताचा नागरिक या फेलोशिपसाठी अर्ज करु शकेल.

महिन्याला 45 हजार रुपये मानधन, 'मुख्यमंत्री फेलोशिप'साठी अर्ज करण्यासाठी शेवटचे दोन दिवस

मुंबई : प्रशासनामध्ये युवकांना सहभागी करुन घेण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री फेलोशिप हा कार्यक्रम राबवण्यात येत आहे. यंदाच्या ‘मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम- 2019’ मध्ये सहभागाची अंतिम मुदत 14 जून 2019 पर्यंत असून इच्छुकांनी ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमातून निवड झालेल्या युवकांचा उत्साह, नावीन्यपूर्ण दृष्ट‍िकोन व तंत्रज्ञानातील त्यांची गती यांचा प्रशासनास उपयोग व्हावा आणि सोबतच युवकांनाही शासनासोबत काम करण्याचा अनुभव मिळावा, हे या कार्यक्रमाचे मुख्य उद्द‍िष्ट आहे. तरुणांमध्ये नेतृत्वगुण विकसित होतील, सामाजिक क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्यांना तसा अनुभव मिळेल, अशा रितीने हा कार्यक्रम आखण्यात आला आहे.

या 11 महिन्यात शासनासोबत काम करण्याची संधी देणं, तंत्रज्ञान-पायाभूत सुविधा-सामाजिक विकास क्षेत्रातील विविध उपक्रम आणि प्रकल्प यांची अंमलबजावणी तसेच धोरण निर्मिती यामध्ये त्यांना सहभागी करुन घेणं, हा उद्देश यातून साध्य करण्यात येतो.

उद्याचा महाराष्ट्र घडवण्यासाठी शासनासोबत या, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी युवकांना  केले आहे. 21 ते 26 वयोगटातील, प्रथम वर्ग पदवीधर आणि पूर्णवेळ कामाचा एक वर्षाचा अनुभव असलेला भारताचा नागरिक या फेलोशिपसाठी अर्ज करु शकेल. फेलोशिपचा कालावधी 11 महिन्यांचा असून फेलोला मानधन आणि प्रवासखर्चासाठी दरमहा 45 हजार रुपये दिले जातात. फेलोशिपसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया आहे. https://mahades.maharashtra.gov.in/FELLOWSHIP/marathi/index.jsp या वेबसाईटवर या फेलोशिपसंदर्भात अधिक माहिती देण्यात आली आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *