सिडकोकडून पोलिसांसाठी 4,466 घरांची योजना, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

सिडकोच्या गृहनिर्माण योजनेतील 3,760 यशस्वी अर्जदारांना घरांचे ऑनलाईन वाटप, तसेच व्हर्चुअल निवारा केंद्राचे आणि खारघर हेवन हिल्स प्रकल्पाचा शुभारंभ आज झाला.

सिडकोकडून पोलिसांसाठी 4,466 घरांची योजना, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ
Follow us
| Updated on: Jul 28, 2020 | 12:01 AM

नवी मुंबई : “पोलिस अविरतपणे दिवस-रात्र आपल्या जीवाची आणि (CIDCO Plan Of 4466 Houses For Police) परिवाराची पर्वा न करता आपल्या संरक्षणार्थ उभे असतात. अशा पोलिसांना हक्काचे आणि स्वप्नातले घर सिडकोच्या या गृहनिर्माण योजनेच्या माध्यमातून प्राप्त होणार आहे”, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. आज पोलिसांसाठी असलेल्या 4,466 घरांच्या योजनेचा शुभारंभ झाला. सिडकोच्या गृहनिर्माण योजनेतील 3,760 यशस्वी अर्जदारांना घरांचे ऑनलाईन वाटप, तसेच व्हर्चुअल निवारा केंद्राचे आणि खारघर हेवन हिल्स प्रकल्पाचा शुभारंभ या कार्यक्रमाच मुख्यमंत्री बोलत होते. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवारही उपस्थित होते (CIDCO Plan Of 4466 Houses For Police).

सिडकोतर्फे सदनिकांच्या सोडतीतील विविध टप्प्यांत जसे व्हर्च्युअल निवारा केंद्र आणि ऑनलाईन माध्यमातून वाटपपत्र प्रदान करणे यांसारख्या प्रणाली आणि प्रक्रियांमधून उच्च दर्जाची पारदर्शकता राखण्यात येत आहे. ही पारदर्शकता अजोड असून अनुकरणीय आहे.

त्याचबरोबर सिडकोतर्फे निसर्गाच्या सान्निध्यात साकारण्यात येत असलेल्या खारघर हेवन हिल्स प्रकल्पाच्या माध्यमातून नवीन वृक्षांची लागवड करुन निसर्गाचा समतोल राखण्याचा प्रयत्न केला जात आहे. महाराष्ट्रात अशा प्रकारचे हिल स्टेशन साकारला जाणे ही खरंच खूप अभिमानाची गोष्ट आहे. याशिवाय, सिडकोतर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 1 कोटी रुपयांची करण्यात आलेली मदत अतिशय महत्वपूर्ण असल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले.

आपले स्वतःचे घर असावे असे प्रत्येकाने उराशी बाळगलेलं एक स्वप्न असते. पोलीसदेखील यापेक्षा वेगळे नाहीत. त्यांच्या हक्काच्या घराचे स्वप्न आज सिडकोच्या या गृहनिर्माण योजनेच्या माध्यमातून पूर्ण होत आहे ही खूप आनंदाची गोष्ट आहे. ब्रिटीशांच्या काळात महाराष्ट्रात अनेक हिल स्टेशन्स साकारली गेली. परंतु, त्यानंतर खारघर हेवन हिल्स प्रकल्पाच्या माध्यमातून निसर्गाचा समतोल राखून असे हिल स्टेशल सिडकोतर्फे साकारण्यात येत आहे. ही महाराष्ट्राच्या दृष्टीने खरोखरच अभिमानाची गोष्ट आहे. याशिवाय ऑनलाईन माध्यमातून प्रदान करण्यात आलेली वाटपपत्रे आणि व्हर्च्युअल निवारा केंद्राचा या कोरोना पॅनडेमिकच्या कठिण परिस्थितीत अर्जदारांना नक्कीच फायदा होईल, असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

CIDCO Plan Of 4466 Houses For Police

संबंधित बातम्या :

पनवेलमध्ये खासगी रुग्णालयांकडून लूट, मनसेचा आरोप

नवी मुंबईत कोरोना चाचण्यांची क्षमता वाढवणार, बेड्सही दुप्पट, महापालिका आयुक्तांचा निर्णय

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.