माझ्यावर टीकेची करुन कामना, विखे पाटील वाचतात सामना, मुख्यमंत्र्यांची शेरोशायरी

मुंबई: विधीमंडळाचं अधिवेशन म्हटलं की सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातल्या कुरघोडीचं राजकारण आलंच. अधिवेशनाचे सारे दिवस विरोधकांचे असले, तरी शेवटचा दिवस मात्र सत्ताधाऱ्यांचा असतो हे निश्चित. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अधिवेशन समारोपाच्या भाषणात कवितेद्वारे विरोधकांना चोख प्रत्युत्तर दिलं.शिवाय शिवसेनेबरोबर युती होईल आणि युतीचेच सरकार येईल असाही विश्वास कवितेतून व्यक्त केला. मुख्यमंत्र्यांची कविता मराठा आरक्षणाचं टेन्शन काही काळ …

माझ्यावर टीकेची करुन कामना, विखे पाटील वाचतात सामना, मुख्यमंत्र्यांची शेरोशायरी

मुंबई: विधीमंडळाचं अधिवेशन म्हटलं की सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातल्या कुरघोडीचं राजकारण आलंच. अधिवेशनाचे सारे दिवस विरोधकांचे असले, तरी शेवटचा दिवस मात्र सत्ताधाऱ्यांचा असतो हे निश्चित. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अधिवेशन समारोपाच्या भाषणात कवितेद्वारे विरोधकांना चोख प्रत्युत्तर दिलं.शिवाय शिवसेनेबरोबर युती होईल आणि युतीचेच सरकार येईल असाही विश्वास कवितेतून व्यक्त केला.

मुख्यमंत्र्यांची कविता

मराठा आरक्षणाचं टेन्शन काही काळ का होईना डोक्यावरुन उतरल्यामुळं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना थोडं हलकं वाटत होतं. त्यांच्यातलं हे हलकेपण अत्यंत मिश्कीलपणे काल विधिमंडळामध्ये बघायला मिळालं. विरोधकांनी दोन आठवडे घेतलेल्या चिमट्यांची त्यांना परतफेडच करायची होती. त्याची सुरवात त्यांनी विखे-पाटलांपासून केली.

माझ्यावर टीकेची करून कामना,
विखे पाटील वाचतात सामना
संघर्ष यात्रेला लाभेना गर्दी
म्हणून त्यांच्या घरी वर्तमानपत्रांची वर्दी

विखे पाटील विरोधी पक्षनेते आहेत. त्यांचं मुख्यमंत्र्यांबरोबर तसं चांगलं जमतंयसुद्धा. पण दोघांनाही सभागृहामध्ये एकमेकांचे विरोधक आहोत हे दाखवावंच लागतं.

जनता जनार्दन आमच्याच बाजूला
आणि तुमची खुर्ची असेल ‘त्याच’ बाजूला

विखे पाटलांना टोले हाणत मुख्यमंत्री मग शिवसेनेबरोबरच्या युतीकडं वळले. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत कितीही युती होणार नाही म्हणत असले तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काल शिवसेनेचा फुगा फोडलाच. 2019 ची निवडणूक भाजप-सेना एकत्र येऊनच लढतील आणि त्यात विजयही मिळवतील असं एकतर्फी सांगून टाकलं.

2019 चा महासंग्राम आला जवळ,
बाजी मारणार सेनेचा बाण अन भाजपचे कमळ!

शिवसेनेला विधानपरिषद आणि विधानसभेचं उपाध्यक्षपद देऊन भाजपनं एक पाऊल पुढं टाकलं आहे. शिवसेनेनंही राममंदिराचा मुद्दा उचलून युतीला तयार आहोत असे संकेत यापूर्वीच दिलेत. पण चार वर्षे शिव्यांची लाखोली वाहिलेल्या शिवसेनेला भाजपचा हात अचानक हातात घेणं कसं जमेल हेच औत्सुक्त्याचं आहे.

सरकारने निर्णय घ्यायला उशिर केला म्हणतात, त्यालाही मुख्यमंत्र्यांनी शेरो शायरीतून उत्तर दिलं –

गिरते है शाह सवार ही मैदान-ए -जंग में,
वो तिफ़्ल क्या गिरेंगे जो घुटनो के बल चलें… ‘

 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *