कोणाला त्रास झाला तर झाला, आता कडक पावलं उचलावीच लागतील : मुख्यमंत्री

मुंबईत मोठ्या प्रमाणावर नाल्यांच्याजवळ 4 मजली स्ट्रक्चर झोपडपट्टी आहे. त्यामुळे यावर आम्ही आता कडक भूमिका घेऊन ते structure तोडणार आहोत. करण नाला मोठा करण हे आवश्यक आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.

कोणाला  त्रास झाला तर झाला, आता कडक पावलं उचलावीच लागतील : मुख्यमंत्री

मुंबई : मुंबईतील तुफान पाऊस आणि मालाडमधील भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत निवेदन दिलं. मुंबईत ज्या झोपडपट्ट्या आहेत त्याबाबत कडक भूमिका घ्यावा लागतील. काही लोकांना त्रास होईल, पण दुर्घटना टाळण्यासाठी कडक पावलं उचलावी लागतील, असं मुख्यमंत्री म्हणाले. अतिक्रमणं झालेल्या ठिकाणी, नदी नाल्याच्या बाजूची बांधकामं याबाबतही कडक भूमिका घ्यावी लागतील, असं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं.

मुंबईत मोठ्या प्रमाणावर नाल्यांच्याजवळ 4 मजली स्ट्रक्चर झोपडपट्टी आहे. त्यामुळे यावर आम्ही आता कडक भूमिका घेऊन ते structure तोडणार आहोत. करण नाला मोठा करण हे आवश्यक आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.

राष्ट्रवादी नेते छगन भुजबळ यांनी मालाड दुर्घटनेप्रकरणी जी एसआरएच्या चौकशीची मागणी केली आहे, ती निश्चित केली जाईल. तसंच या संपूर्ण प्रकरणाची (मुंबईत पाडलेला पाऊस) उच्च स्तरीय चौकशी केली जाईल. नालेसफाईचा आढावा घेतला जाईल. वेळेच्या आत नालेसफाई झाली पाहिजे हे तथ्य आहे. नालेसफाईबाबत जे धोरण आहे, त्याबाबत महापालिकेकडून आढावा घेतला जाईल, असं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं.

मालाड भिंत दुर्घटनेत 18 जणांचा मृत्यू

मालाड इथे भिंत कोसळून 18 जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी शोक व्यक्त केला.  “सर्वात पहिल्यांदा जे लोक मृत्यूमुखी पडले त्यांच्याप्रति मी शोक व्यक्त करतो. ही घटना अतिशय गंभीर आहे, पण काल मुंबईत अभूतपूर्व पाऊस पडला. 375mm पासून 400mm पर्यंत पाऊस पडला. याआधी असा पाऊस 1974 मध्ये पडला होता. त्यानंतर 2005 मध्ये पाऊस पडला. त्यामुळे 40 वर्षात दुसऱ्यांदा असा पाऊस पडला” अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

मालाड दुर्घटनेत 18 लोकांचा मृत्यू झाला, तर 75 जण जखमी आहेत.  14 जणांना उपचारानंतर सोडण्यात आले. या दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना राज्य सरकारकडून 5 तर महापालिकेकडून 5 लाख रुपये देण्यात येतील असं मुख्यमंत्री म्हणाले.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *