ONGC गॅस प्रोसेसिंग प्लांटमध्ये बिघाड, CNG च्या तुटवड्याची शक्यता

उरण येथील ओएनजीसीच्या गॅस (ONGC Gas) प्रोसेसिंग प्लांटमध्ये मोठा तांत्रिक बिघाड झाला आहे. त्यामुळे मुंबईतील सीएनजी गॅस (CNG Gas) पंपावर पुरवठ्यात अडचण निर्माण झाली आहे.

ONGC गॅस प्रोसेसिंग प्लांटमध्ये बिघाड, CNG च्या तुटवड्याची शक्यता

मुंबई : उरण येथील ओएनजीसीच्या गॅस (ONGC Gas) प्रोसेसिंग प्लांटमध्ये मोठा तांत्रिक बिघाड झाला आहे. त्यामुळे मुंबईतील सीएनजी गॅस (CNG Gas) पंपावर पुरवठ्यात अडचण निर्माण झाली आहे. यामुळे गॅस पंपावर वाहन चालकांच्या मोठ्या प्रमाणात लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहे.

उरण येथील ओएनजीसीच्या गॅस प्रोसेसिंग मध्ये मोठ्या तांत्रिक समस्येमुळे, महानगर गॅस लिमिटेडला गॅसचा पुरवठा कमी झाला आहे. तसेच गॅसचा कमी प्रमाणात प्रवाह आणि कंडेन्सेटचा उच्च प्रवाह यामुळे वडाळा येथील एमजीएलच्या सिटी गेट स्टेशनला वायू पुरवठा खंडित करण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईतील अनेक गॅस पंपावर सीएनजीचा तुटवडा निर्माण झाला आहे.

दरम्यान घरगुती गॅस ग्राहकांना कोणत्याही अडचणीशिवाय गॅस पुरवठा करण्यात येईल, असे महानगर गॅस लिमिटेडकडून सांगण्यात येत आहे.

ओएनजी गॅस प्रोसेसिंगच्या तांत्रिक बिघाडामुळे मुंबईतील अनेक सीएनजी स्टेशन बंद राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच राज्य परिवहन उपक्रमांमधील सीएनजी पुरवठ्यावरही याचा परिणाम होऊ शकतो. ओएनजीसीकडून नैसर्गिक वायूचा पुरवठा पूर्ववत होताच गॅसचा पुरवठा सामान्य पद्धतीने सुरु करण्यात येईल, असे सांगण्यात येत आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *