गोव्यानंतर आता मुंबई ते सुरत क्रूझ सेवा, तिकीट किती?

गोव्यानंतर आता लवकरच मुंबई ते सुरत क्रूझ सेवा सुरु करण्यात (mumbai to surat cruz service) येत आहे. त्यामुळे आता मुंबईकरांना सुरतलाही क्रूझने प्रवास करता येणार आहे.

गोव्यानंतर आता मुंबई ते सुरत क्रूझ सेवा, तिकीट किती?
Follow us
| Updated on: Nov 02, 2019 | 9:31 AM

मुंबई : गोव्यानंतर आता लवकरच मुंबई ते सुरत क्रूझ सेवा सुरु करण्यात (mumbai to surat cruz service) येत आहे. त्यामुळे आता मुंबईकरांना सुरतलाही क्रूझने प्रवास करता येणार आहे. ही सेवा येत्या 5 नोव्हेंबर रोजी सुरु होणार आहे. वांद्रे-वरळी सीलिंक येथून ही सेवा सुरु होईल. एसएसआर मरीन सर्व्हिसेज मेडेन क्रूझ शिपकडून ही सेवा (mumbai to surat cruz service) सुरु करण्यात येत आहे.

येत्या 5 नोव्हेंबरला पहिली क्रूझ मुंबईहून सुरतसाठी सुटण्याची शक्यता आहे. तसेच या क्रूझमध्ये एका प्रवाशाचं तिकीट 3 ते 5 हजार असेल. मुंबई ते सुरत सेवा प्रत्येक आठवड्याला सुरु राहील, असंही सांगितलं जात आहे.

प्रत्येक गुरुवारी वांद्रे-वरळी सीलिंक येथून संध्याकाळी 5 वाजता एक क्रूझ सुरतसाठी निघेल. तर शुक्रवारी सकाळी 9 वाजता ती सुरत येथे पोहचेल. त्यानंतर सुरतवरुन त्याचदिवशी संध्याकाळी 5 वाजता क्रूझ पुन्हा मुंबईकडे यायला निघेल आणि दुसऱ्या दिवशी मुंबहून पुन्हा सकाळी 9 वाजता सुरतला जाण्यासाठी निघेल.

मुंबई-गोवा जाण्यासाठी जी एकमेव क्रूझ आहे त्याला प्रवाशांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. तसेच क्रूझ सेवा चालवणाऱ्या कंपनीलाही याचा मोठा फायदा होत आहे. मुंबईत आपली सेवा सुरु करण्यासाठी आणि वाढवण्यासाठी गेल्या तीन वर्षात क्रूझ पर्यटनाला महत्त्व दिले जात आहे.

यावर्षी म्हणजे 2019 मध्ये तब्बल 2.32 लाख देशी-विदेशी पर्यटकांनी मुंबई ते गोवा क्रूझने प्रवास केला. 2017-18 मध्ये मुंबईतून एकूण 46 क्रूझ निघाले ज्यामध्ये 56 हजार पर्यटकांनी प्रवास केला होता. 2018-19 मध्ये क्रूझच्या संख्येत वाढ करुन ती 107 केली. त्यामुळे पर्यटकांच्या संख्येत वाढ होऊन ती 87 हजारपर्यंत पोहचली. तसेच 2021 मध्ये देशातील पहिले आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनल सुरु करण्याची योजना आहे, असं बोललं जात आहे.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.