तळीरामांना चुटपूट, ऑक्टोबर महिन्यात 8 दिवस ‘ड्राय डे’

येत्या ऑक्टोबर महिन्यात तब्बल 8 दिवस ड्राय डे (Dry Days In October) असणार आहे. त्यामुळे राज्यभरातील तळीरामांना कोणत्याही प्रकारच्या सेलिब्रेशनसाठी थोडा त्रास सहन करावा लागणार आहे.

तळीरामांना चुटपूट, ऑक्टोबर महिन्यात 8 दिवस 'ड्राय डे'
Follow us
| Updated on: Sep 24, 2019 | 1:18 PM

मुंबई : येत्या ऑक्टोबर महिन्यात दसरा दिवाळी हे दोन्ही महत्त्वाचे सण आहेत. सण म्हटलं की, अनेकजण बाहेर पार्टी, नाईट आऊट करण्याचा प्लॅन करतात. जर तुम्हीही ऑक्टोबर महिन्यात (Dry Days In October) मद्यप्राशन करण्याचा प्लॅन करत असाल. तर तळीरामांची चांगलीच पंचाईत होऊ शकते. कारण येत्या ऑक्टोबर महिन्यात तब्बल 8 दिवस ड्राय डे (Dry Days In October) असणार आहे. त्यामुळे राज्यभरातील तळीरामांना कोणत्याही प्रकारच्या सेलिब्रेशनसाठी थोडा त्रास सहन करावा लागणार आहे.

ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पहिला ड्राय डे असणार आहे. बुधवारी 2 ऑक्टोबरला गांधी जंयती असल्याने या दिवशी विदेशी मद्य, देशी दारू, ताडीची दुकाने बंद राहणार आहेत. त्यानंतर लगेचच दुसऱ्या आठवड्यात मंगळवारी 8 ऑक्टोबरला दसरा असल्याने दारुची दुकाने बंद राहतील. तसेच रविवारी 13 ऑक्टोबरला वाल्मिकी जयंती असल्याने दारुची दुकाने बंद राहणार आहेत.

त्याशिवाय सोमवारी 21 ऑक्टोबरला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसाठी (Dry Days In October) मतदान होणार आहे. त्यामुळे त्यापूर्वी 48 तास मद्यविक्रीस मनाई करण्यात येते. त्यामुळे शनिवार 19 ऑक्टोबर, रविवार 20 ऑक्टोबर या दोन्ही दिवशी राज्यात मद्यविक्री होणार नाही.

सोमवारी 21 ऑक्टोबर विधानसभेसाठी मतदान होणार असल्याने त्या दिवशी दारुची दुकानं बंद असणार आहेत. तर गुरुवारी 24 ऑक्टोबर 2019 रोजी मतमोजणी पार पडणार असल्याने त्या दिवशीही दारु विक्री पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर रविवारी 27 ऑक्टोबरला नरक चतुर्थी आणि लक्ष्मीपूजन असल्याने विदेशी मद्य, देशी दारू, ताडी दुकाने बंद राहणार आहेत.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.