छातीत रॉड घुसून जबड्यावाटे कवटीतून बाहेर, गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी

आनंद पांडे, टीव्ही 9 मराठी, मुंबई : देव तारी त्याला कोण मारी, या म्हणीचा प्रत्यय मुंबईतील चेंबूर परिसरात बघायला मिळाला. उंच इमारतीच्या 13 व्या मजल्यावरुन पडलेल्या मजुरावर डॉक्टरांनी गुंतागुंतीची यशस्वी शस्त्रक्रिया केली. महत्त्वाचं म्हणजे या मजुराच्या छातीत सळई घुसून ती जबड्यावाटे डोक्यातून कवटी फोडून बाहेर आली होती. मात्र चेंबूर येथील झेन मल्टीस्पेशॅलिटी रुग्णालयातील डॉक्टरांनी जबरदस्त कामगिरी …

छातीत रॉड घुसून जबड्यावाटे कवटीतून बाहेर, गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी

आनंद पांडे, टीव्ही 9 मराठी, मुंबई : देव तारी त्याला कोण मारी, या म्हणीचा प्रत्यय मुंबईतील चेंबूर परिसरात बघायला मिळाला. उंच इमारतीच्या 13 व्या मजल्यावरुन पडलेल्या मजुरावर डॉक्टरांनी गुंतागुंतीची यशस्वी शस्त्रक्रिया केली. महत्त्वाचं म्हणजे या मजुराच्या छातीत सळई घुसून ती जबड्यावाटे डोक्यातून कवटी फोडून बाहेर आली होती. मात्र चेंबूर येथील झेन मल्टीस्पेशॅलिटी रुग्णालयातील डॉक्टरांनी जबरदस्त कामगिरी करुन, 24 वर्षीय कामगाराचा जीव वाचवला.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

राकेश जाधव हा 24 वर्षीय कामगार चेंबूरमधील बांधकाम सुरु असलेल्या इमारतीमध्ये मजुरीचं काम करत होता. त्यावेळी तोल गेल्यामुळे तो 13 व्या मजल्यावरुन खाली कोसळला. खाली बांधकाम साहित्य असल्यामुळे लोखंडी रॉड थेट त्याच्या छातीत घुसला. छातीतून हा रॉड वर जबड्यात आणि तिथून डोक्याच्या कवटीतून बाहेर आला. मंगळवारी 20 नोव्हेंबरला ही घटना घडली. त्यावेळी सहकाऱ्यांनी राकेशला तातडीने चेंबूर येथील झेन रुग्णालयात दाखल केलं.

यावेळी डॉक्टरांसमोर त्याच्या डोक्यात घुसलेली सळई काढण्याचं मोठं आव्हान होतं. कारण ती सळई राकेशच्या छातीतून जबड्यावाटे कवटी फोडत डोक्यातून बाहेर आली. त्यामुळे ऑपरेशन नेमकं करायचं कसं, असा प्रश्न डॉक्टरांसमोर होता. डॉक्टरांनी ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया केली. तब्बल 5 तास ही शस्त्रक्रिया सुरु होती. डॉक्टरांच्या टीमने घेतलेल्या अथक परिश्रमानंतर अखेर राकेशला वाचविण्यात यश आले.

“मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या वाहिनीला गंभीर दुखापत झाल्याने ही शस्त्रक्रीया अतिशय आव्हानात्मक ठरली. अशा प्रकरणांत रुग्णाचा मृत्यू होण्याची शक्यता नाकारता येत नाही”, असे झेन रुग्णालयाचे संचालक डॉ. रॉय पाटणकर यांनी सांगितले.

डॉ. बटुक डिओरा, डॉ. प्रमोद मस्जीद, डॉ. प्रमोद काळे तसेच त्यांच्या टीमने  ही शस्त्रक्रिया केली.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *