आंतरधर्मीय लग्न केल्याने नवदाम्पत्यावर मुंबई सोडण्याची वेळ

सुधाकर काश्यप , टीव्ही 9 मराठी, मुंबई : अँटोप हिल येथे राहणाऱ्या नवदाम्पत्याने आंतरधर्मीय लग्न केल्याने त्यांच्यावर मुंबई सोडून जण्याची वेळ आली आहे. मुलीच्या घरचे सतत हल्ले करत असल्याने अखेर या नवदाम्पत्याने अखेर अॅड. आनंद जोंधळे यांच्यामार्फत मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली. त्याची दखल घेऊन हायकोर्टाने या नवदाम्पत्याला पोलीस संरक्षण देण्याचे आदेश दिले आहेत. मात्र […]

आंतरधर्मीय लग्न केल्याने नवदाम्पत्यावर मुंबई सोडण्याची वेळ
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 5:02 PM

सुधाकर काश्यप , टीव्ही 9 मराठी, मुंबई : अँटोप हिल येथे राहणाऱ्या नवदाम्पत्याने आंतरधर्मीय लग्न केल्याने त्यांच्यावर मुंबई सोडून जण्याची वेळ आली आहे. मुलीच्या घरचे सतत हल्ले करत असल्याने अखेर या नवदाम्पत्याने अखेर अॅड. आनंद जोंधळे यांच्यामार्फत मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली. त्याची दखल घेऊन हायकोर्टाने या नवदाम्पत्याला पोलीस संरक्षण देण्याचे आदेश दिले आहेत. मात्र त्यानंतरही त्यांना संरक्षण दिले गेले नाही.

विजय आणि नुसरत हे अँटोप हिल येथील एका वस्तीत शेजारी शेजारी राहायचे. अगदी लहानपणापासून एकमेकांना ओळखतात. लहानपणापासून त्यांची मैत्री होती. वयात आल्यानंतर ते एकमेकांच्या प्रेमात पडले. नुसरतसाठी विजय आणि विजयसाठी नुसरत असं त्यांचं जग झालं. याची कुणकुण लागताच नुसरतच्या घरच्यांनी तिला गावी पाठवलं. मात्र काही दिवसातच नुसरत पुन्हा मुंबईत परतली.

नुसरत ज्या वस्तीत राहते, त्या वस्तीत तिच्या नातेवाईकांची 100 घरं आहेत, तर विजयच्या नातेवाईकांची केवळ तीन-चार घरं आहेत. त्यामुळे विजय आणि नुसरतच्या संबंधाची कुणकुण लागताच नुसरतचे शेकडो नातेवाईक विजयच्या घरावर चाल करुन यायचे. दोघे पळून गेल्यावर तर विजयच्या कुटुंबीयांवर आभाळ कोसळलं होतं. सतत हल्ले होऊ लागले.

त्यानंतर विजय आणि नुसरत यांनी पळून जाऊन लग्न केलं. काही महिने ते गायब झाले. कुणाच्याच संपर्कात नव्हते. इकडे मात्र विजय आणि त्याच्या नातेवाईकांना सतत त्रास होत होता. पोलिसात तक्रारी केल्या, पण काही कारवाई झाली नाही. यामुळे अखेर नुसरतने अॅड. आनंद जोंधळे यांच्यामार्फत मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली. कोर्टानेही त्यांच्या तक्रारीची दखल घेऊन पोलीस आयुक्तांना संरक्षण देण्याचे आदेश दिलेत.

एकंदरीत दहशतीत वावरणाऱ्या विजय आणि नुसरत या दाम्पत्यावर मुंबई सोडून जाण्याची वेळ आली आहे. आता तरी पोलिस या प्रकरणाकडे गांभिर्याने पाहतील का, हा प्रश्न आहेच.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.