हार्बर रेल्वेवर माहिमजवळ लोकलचे चार डबे घसरले, सीएसएमटी-वांद्रे वाहतूक ठप्प

सीएसएमटी-वांद्रे लोकलचे चार डबे माहिम स्टेशनवर जाण्यापूर्वी रुळावरुन घसरले आहेत. अपघातानंतर लोकलमधील प्रवाशांनी रुळावर उतरुन चालण्यास सुरुवात केली

हार्बर रेल्वेवर माहिमजवळ लोकलचे चार डबे घसरले, सीएसएमटी-वांद्रे वाहतूक ठप्प

मुंबई : मुंबईत हार्बर रेल्वेवर लोकलचे डबे घसरल्यामुळे वाहतूक ठप्प (Harbor Local Derailed in Mahim) झाली आहे. सीएसएमटीहून वांद्र्याच्या दिशेने जाणाऱ्या लोकलचे डबे माहिम स्टेशनजवळ रुळावरुन घसरले. सुदैवाने या अपघातामध्ये कोणालाही दुखापत झाल्याची माहिती नाही.

सीएसएमटी-वांद्रे लोकलचे चार डबे माहिम स्टेशनवर जाण्यापूर्वी रुळावरुन घसरले आहेत. अपघातानंतर लोकलमधील प्रवाशांनी रुळावर उतरुन चालण्यास सुरुवात केली. सकाळी अकरा वाजताच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.

रुळावरुन रेल्वे घसरली, त्यावेळी लोकलचा वेग फार जास्त नसल्यामुळे मोठा अपघात टळला. घसरलेले डबे (Harbor Local Derailed in Mahim) रेल्वे रुळावरुन हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरु आहे. मात्र त्यामुळे हार्बर रेल्वेवरील वांद्र्याच्या दिशेची वाहतूक तूर्तास थांबवण्यात आली आहे.

लोकलचे डबे घसरण्यामागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही, मात्र रेल्वे प्रशासनाकडून वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न प्राथमिक तत्त्वावर सुरु आहे.

 

 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *