सीएसएमटी पूल दुर्घटनेप्रकरणी दोन अधिकाऱ्यांचे निलंबन

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज स्टेशनबाहेरील दादाभाई नौरोजी मार्गावरील हिमालय पादचारी पूल गुरुवारी सायंकाळी कोसळला. या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला, तर 31 जण जखमी झाले. या दुर्घटनेप्रकरणी मुंबई महापालिकेकडून संबंधित अभियंत्यांवर पहिली कारवाई करण्यात आली आहे. या पुलाच्या ऑडिटसंबंधी जबाबदार दोन अभियंत्यांचं निलंबन करण्यात आलं आहे. तर इतर दोन अभियंत्यांची चौकशी करण्याचे आदेश पालिकेने दिले …

सीएसएमटी पूल दुर्घटनेप्रकरणी दोन अधिकाऱ्यांचे निलंबन

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज स्टेशनबाहेरील दादाभाई नौरोजी मार्गावरील हिमालय पादचारी पूल गुरुवारी सायंकाळी कोसळला. या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला, तर 31 जण जखमी झाले. या दुर्घटनेप्रकरणी मुंबई महापालिकेकडून संबंधित अभियंत्यांवर पहिली कारवाई करण्यात आली आहे. या पुलाच्या ऑडिटसंबंधी जबाबदार दोन अभियंत्यांचं निलंबन करण्यात आलं आहे. तर इतर दोन अभियंत्यांची चौकशी करण्याचे आदेश पालिकेने दिले आहेत. तसेच मुंबईतील 296 पुलांचं पुन्हा ऑडिट करण्यात येणार आहे.

सीएसएमटी पूल दुर्घटनेप्रकरणी मुख्य अभियंता  ए. आर. पाटील आणि सहाय्यक अभियंता एसएफ काकुळते यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तर, मुख्य अभियंता एस. ओ. कोरी आणि उपमुख्य अभियंता आर. बी. तारे यांची खात्याअंतर्गत चौकशी केली जाणार आहे.  या दुर्घटनेप्रकरणी आझाद मैदान पोलिसांत कलम 304 ए अंतर्गत रेल्वे आणि महापालिका अधिकाऱ्यांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या याचिकेवर 22 मार्चला मुंबई हायकोर्टात सुनावणी होणार आहे.

या पुलासंबंधी स्ट्रक्चरल ऑडिटचा चुकीचा अहवाल देणाऱ्या जे. डी. देसाई कन्सलटंटला काळ्या यादीत टाकण्याचे काम सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तर कंत्राटदार मे. आरपीएस कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

सीएसएमटीबाहेरील पूल दुर्घटनेची जबाबदारी मुंबई महानगरपालिका आणि रेल्वे प्रशासन अशा दोघांनीही झटकली होती. पण अखेर महापालिकेने हा पूल त्यांचा असल्याचं मान्य केलं.

मुंबईचे महापौर काय म्हणाले?

घटना घडली ती अत्यंत दुर्दैवी आहे. तो पादचार पूल रेल्वेचा होता आणि मेन्टेनन्स मुंबई महानगरपालिका करत होती. सदर पुलाच्या पुनर्बांधणीकरता आणि मेन्टेनन्सकरता सातत्याने रेल्वेकडे पाठपुरावा केला, एनओसी मागितली. रेल्वेकडून एनओसी मिळाली नाही, त्यामुळे त्या पुलाची दुरुस्ती करणं शक्य झालं नाही. त्याला पूर्णत्वाने रेल्वे जबाबदार आहे.

कसाब पूल

मुंबईवर 2008 मध्ये 26/11 रोजी जो हल्ला झाला होता, तेव्हापासून हा ब्रिज कसाब पूल म्हणून ओळखला जातो. दहशतवादी अजमल कसाब सीएसएमटी स्टेशनवर फायरिंग करुन याच ब्रिजवरुन चालत चालत पुढे कामा हॉस्पिटलकडे गेला होता. या ब्रिजवर असताना महाराष्ट्र टाईम्सच्या फोटोग्राफरने फोटो काढण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी कसाबने त्यांच्या दिशेने फायरिंग केल्याचं सांगण्यात येत होतं. त्यानंतर कसाब पुढे छोट्याशा गल्लीतून कामा हॉस्पिटलकडे गेला. तेव्हापासून हा ब्रिज कसाब पूल म्हणून ओळखला जातो.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *