VIDEO: माकडछाप स्टंटबाजांच्या लोकलमध्ये पुन्हा उड्या

मुंबई: धावत्या लोकल रेल्वेमध्ये माकडउड्या मारत स्टंटबाजी करणारे बहाद्दर मुंबईच्या लोकल स्टेशनवर अनेकवेळा पाहायला मिळतात. त्यांचे अनेक व्हिडीओ यापूर्वीही समोर आले आहेत. आता या माकडउड्या मारणाऱ्यांचे दोन नवे व्हिडीओ समोर आले आहेत. एक व्हिडीओ घाटकोपर ते कुर्ल्यादरम्यानचा आहे तर दुसरा रे रोड परिसरातील आहे. घाटकोपरमधील व्हिडीओत दोन माकडछाप स्टंटबाज लोकलला लटकलेले दिसतात. धावत्या लोकलच्या दरवाजात …

VIDEO: माकडछाप स्टंटबाजांच्या लोकलमध्ये पुन्हा उड्या

मुंबई: धावत्या लोकल रेल्वेमध्ये माकडउड्या मारत स्टंटबाजी करणारे बहाद्दर मुंबईच्या लोकल स्टेशनवर अनेकवेळा पाहायला मिळतात. त्यांचे अनेक व्हिडीओ यापूर्वीही समोर आले आहेत. आता या माकडउड्या मारणाऱ्यांचे दोन नवे व्हिडीओ समोर आले आहेत.

एक व्हिडीओ घाटकोपर ते कुर्ल्यादरम्यानचा आहे तर दुसरा रे रोड परिसरातील आहे.

घाटकोपरमधील व्हिडीओत दोन माकडछाप स्टंटबाज लोकलला लटकलेले दिसतात. धावत्या लोकलच्या दरवाजात लटकून, बाहेरच्या खांबाला स्पर्श करण्याचा प्रयत्न हा स्टंटबाज करतो. त्याचा हा कारनामा मोबाईलमध्ये रेकॉर्ड करण्यात आला. सध्या या व्हिडीओवरुन रेल्वे पोलीस या माकडछाप स्टंटबाजांचा शोध घेत आहेत.

दुसरा व्हिडीओ आहे हार्बर मार्गावरील. रे रोड रेल्वे स्टेशनवर लोकलच्या माल डब्ब्यात दोन तरुण उभे आहेत. ते लोकल सुरु होण्याची वाट पाहात आहेत. ट्रेन सुरु झाल्यानंतर एकजण लोकलच्या दरवाजातील रॉडला पकडून खाली उतरतो आणि ट्रेनसोबत प्लॅटफॉर्मवरुन धावू लागतो. मग ट्रेनमध्ये चढतो, कधी प्लॅटफॉर्मवर पाय घसरत राहतो, अशी स्टंटबाजी तो करत आहे. इतकंच नाही तर हा स्टंटबाज पाय हवेत ठेवून रेल्वेच्या बाहेर डोकावताना दिसतो. रे रोड स्टेशनवर ही स्टंटबाजी करणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

VIDEO:

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *