‘शेर की दहाड है, राहुल शेवाळे’, असं म्हणत राहुल शेवाळेंचा अनोखा प्रचार

मुंबई : देशभरात सध्या लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले अनेक उमेदवार मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध शक्कल लढवत आहेत. दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांनी प्रचारासाठी एक रॅप सॉंग तयार केलं आहे. यंदाची लोकसभा निवडणूक सर्वच पक्षांसाठी महत्त्वाची मानली जात आहे. त्यामुळे सर्व पक्ष आपपल्या उमेदवारांचा जोरदार प्रचार करताना […]

'शेर की दहाड है, राहुल शेवाळे', असं म्हणत राहुल शेवाळेंचा अनोखा प्रचार
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:00 PM

मुंबई : देशभरात सध्या लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले अनेक उमेदवार मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध शक्कल लढवत आहेत. दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांनी प्रचारासाठी एक रॅप सॉंग तयार केलं आहे.

यंदाची लोकसभा निवडणूक सर्वच पक्षांसाठी महत्त्वाची मानली जात आहे. त्यामुळे सर्व पक्ष आपपल्या उमेदवारांचा जोरदार प्रचार करताना दिसत आहे. उमेदवारी जाहिर झाल्यानंतर अनेक उमेदवारांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रचारसभा, बाईक रॅली यांसह विविध क्लुप्त्या लढवल्या. त्यातच दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांनी प्रचारासाठी एक रॅप सॉंग तयार केलं. ‘शेर की दहाड है, राहुल शेवाळे’ असे बोल असणारे हे रॅप गाणं धारावीच्या गल्ल्यांमध्ये चांगलंच प्रसिद्ध झालंय.

धारावीत राहणारा जाफर शहा (26) आणि संजय नागपाल (21) या दोन तरुणांनी हे रॅप साँग तयार केलं आहे. दक्षिण मध्य मुंबईतून 2014 मध्ये राहुल शेवाळे खासदार म्हणून निवडून आले होते. त्यांनी 5 वर्षाच्या कालावधीत या मतदारसंघात अनेक काम केलीत. त्यांच्या या कामामुळे हे दोघेही रॅपर प्रभावित झाले आणि त्यांना राहुल शेवाळे यांच्यावर रॅप गाण तयार करण्याची कल्पना सुचली.

धारावीत राहणारे जाफर आणि संजय हे दोघेही गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई व मुंबईकरांसाठी काही रॅप गाणी बनवतात.  त्यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल शेवाळे यांच्या कामाची माहिती देणारे हे रॅप साँग तयार केलं. ‘शेर की दहाड है, राहुल शेवाळे’ असे या गाण्याचे बोल असून सध्या हे गाणं धारावी तसेच इतर ठिकाणी चांगलेच गाजत आहे.

काही महिन्यांपूर्वी अभिनेता रणवीर सिंग याचा ‘गल्ली बॉय’ हा बॉलिवूड चित्रपट प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट धारावीतील काही रॅप गाणी करणाऱ्या गायकांच्या आयुष्यावर चित्रीत करण्यात आला होता. त्यानंतर राहुल शेवाळेंनी आता या रॅप गाण्याचा वापर करत युवकांना आर्किषत करण्याचा प्रयत्न केला आहे.

Non Stop LIVE Update
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा.
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन.
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही.
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा.
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन.
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार.
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?.