रस्ता अडवण्याचा वाद, डोंबिवलीत शिवसेना-भाजप कार्यकर्ते एकमेकांना भिडले

डोंबिवलीतील भोपर गावात रस्ता अडविण्याच्या वादातून शिवसेना-भाजप कार्यकर्ते एकमेकांना भिडले

रस्ता अडवण्याचा वाद, डोंबिवलीत शिवसेना-भाजप कार्यकर्ते एकमेकांना भिडले
Follow us
| Updated on: Nov 13, 2020 | 1:30 PM

डोंबिवली : रस्ता अडविण्याच्या वादातून शिवसेना-भाजप कार्यकर्ते एकमेकांना भिडले (Dombivali BJP Vs Shivsena). डोंबिवलीतील भोपर गावात ही घटना घडली असून पोलीस पुढील तपास करत आहेत. डोंबिवलीतील भोपरगाव नेहमी चर्चेत असतं. येथील शिवसेना आणि भाजप कार्यकर्ते काहीना काही कारणावरुन आपसात नेहमी भिडत असतात (Dombivali BJP Vs Shivsena).

“नागरिकांसाठी ये-जा करता एक रस्ता आहे. तो रस्ता भाजपचे पदाधिकारी संदीप माळी यांनी बंद केला आहे. रस्ता बंद केल्याने नागरिकांना त्रास होत आहे. काल रात्री संदीप माळी आपले 35 ते 40 समर्थक घेऊन त्या ठिकाणी पोहोचले. त्यांनी नितीन माळीसह त्यांचे नातेवाईक आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर हल्ला केला. या हल्ल्यात नितीन माळी आणि एका शिवसेना कार्यकर्त्याला दुखापत झाली आहे”, असा आरोप शिवसेनेचे शाखाप्रमुख नितीन माळी यांनी केला.

माक्ष, नितीन माळी यांचा आरोप भाजपा नगरसेविका रविना माळी यांनी फेटाळून लावला आहे. “जे काही आरोप लावण्यात आले आहेत, त्याच्यात काही तथ्य नाही. यामध्ये फक्त राजकारण केलं जात आहे. ज्या जागेचा वाद आहे, ती जागा आमच्या मालकीची आहे, विनाकारण काही लोक वाद करत आहे”, असं रविना माळी यांनी म्हटलं.

याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी दोन्ही पक्षांचा कार्यकर्त्यांच्या तक्रारीवर परस्परविरोधी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरु आहे. महापालिका निवडणूक काही महिन्यात होणार आहे. त्याआधी ज्या प्रकारे भोपर गावात शिवसेना-भाजप वाद पेटला आहे. हा वाद चिखळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Dombivali BJP Vs Shivsena

संबंधित बातम्या :

कल्याणमध्ये दोन गटांत हाणामारीदरम्यान अ‍ॅसिड हल्ला, सहाजण गंभीर जखमी

कल्याणच्या पत्रीपुलाच्या संथगती कामामुळे नागरिक हैराण; तीव्र आंदोलनाचा इशारा

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.