Chemical Company Blast | रासायनिक कंपनीत भीषण स्फोट, डोंबिवली हादरली, रक्षाबंधनामुळे मोठी दुर्घटना टळली

डोंबिवली औद्योगिक परिसरातील फेज नंबर-2 मधील अंबर रासायनिक कंपनीत आज अचानक सायंकाळी साडे चार वाजता भीषण स्फोट झाला.

Chemical Company Blast | रासायनिक कंपनीत भीषण स्फोट, डोंबिवली हादरली, रक्षाबंधनामुळे मोठी दुर्घटना टळली

डोंबिवली : डोंबिवली औद्योगिक परिसरातील एका (Dombivali Chemical Company Blast) रासायनिक कंपनीत अचानक भीषण स्फोट झाला. या स्फोटाने अख्खी डोंबिवली हादरली. डोंबिवली औद्योगिक परिसरातील फेज नंबर-2 मधील अंबर रासायनिक कंपनीत आज अचानक सायंकाळी साडे चार वाजता भीषण स्फोट झाला. यावेळी कंपनीचा परिसर स्फोटाने प्रचंड हादरला. या घटनेने प्रोबेस कंपनीच्या स्फोटाची आठवण सर्वांना झाली (Dombivali Chemical Company Blast).

सुदैवाने आज रक्षाबंधनच्या सणामुळे कंपनीतील कामगारांना सुट्टी होती. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. मात्र, या घटनेमुळे औद्योगिक सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

आज सायंकाळी साडे चारच्या सुमारास अंबर रासायनिक कंपनीतून भयंकर मोठा आवाज झाला. या स्फोटाची तीव्रता इतकी भनायक होती की, कंपनीचे छप्पर उडून त्यांच्यावरील सिमेंटचे पत्रेसुद्धा दूरवर उडाले आहेत. सिमेंटच्या पत्र्यांचा अक्षरश: चुरा झाला आहे. कंपनीच्या छताचा लोखंडी सांगाडा छिन्न-विछिन्न झाला आहे. कंपनीत एक लेबर कंत्रटदार होता. तोच या घटनेचा साक्षीदार आहे. मात्र, कंपनीतील जबाबदार व्यक्तींनी घटना घडताच पळ काढला (Dombivali Chemical Company Blast).

स्फोट झाल्याचे कळताच अग्नीशमन दलाच्या गाड्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीसही घटनास्थळी पोहोचले. पोलीस आणि अग्नीशमन दलाने पंचनामा सुरु केला. कंपनीतील रसायनामुळे तांत्रिक काही तरी झाल्याने हा स्फोट झाल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे. कंपनीच्या स्फोटामुळे आजबाजूच्या कंपन्यांच्या छताचे नुकसान झाले आहे. तसेच, कार्यालयातील खिडकीच्या काचा फुटल्या आहेत (Dombivali Chemical Company Blast).

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *