डोंबिवलीत ट्रकची स्कूटरला धडक, आई-वडिलांसह चिमुरडीचा जागीच मृत्यू

चौधरी कुटुंबातील पती पत्नी आणि त्यांच्या चार वर्षांच्या मुलीचा अपघातात जागीच मृत्यू झाला, तर मुलगा जखमी आहे

डोंबिवलीत ट्रकची स्कूटरला धडक, आई-वडिलांसह चिमुरडीचा जागीच मृत्यू

डोंबिवली : डोंबिवलीत ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील तिघांना प्राण गमवावे लागल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. दुचाकीस्वार दाम्पत्यासह त्यांच्या चिमुरड्या मुलीचा मृत्यू झाला, तर मुलगा जखमी झाला आहे. डोंबिवलीतील खांबाळपाडा परिसरात हा अपघात (Dombivali Truck Accident Kills Family) झाला.

चौधरी कुटुंबातील पती पत्नी आणि त्यांच्या चार वर्षांच्या मुलीचा अपघातात जागीच मृत्यू झाला. गणेश चौधरी, उर्मिला चौधरी आणि चार वर्षीय हंसिका चौधरी अशी मृतांची नावं आहेत. पाच वर्षांचा देवांश चौधरी जखमी आहे.

गणेश चौधरी हे आपली पत्नी उर्मिला, चार वर्षांची मुलगी हंसिका आणि पाच वर्षांचा मुलगा देवांश यांच्यासह सकाळी आपल्या दुचाकीने कल्याणहून डोंबिवलीकडे निघाले होते. कल्याण शीळ रस्त्यावरुन टाटा पॉवरकडे वळण घेत असताना खांबाळपाडा भागात एका गेटमधून ट्रक वेगाने बाहेर पडला.

बीडची 30 वर्षीय तरुणी पुण्यातील बंद फ्लॅटमध्ये मृतावस्थेत, घरात दारुच्या बाटल्या आढळल्या

ट्रकला साईड देण्याच्या प्रयत्नात चौधरींच्या दुचाकीचं हँडल ट्रकच्या चाकाला घासलं. त्यामुळे दुचाकीचा तोल जाऊन गणेश, उर्मिला आणि दुचाकीवर पुढे उभी असलेली हंसिका ट्रकच्या मागच्या चाकाखाली फेकले गेले. ट्रकचं चाक अंगावरुन गेल्यामुळे अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला.

आई-वडिलांच्या मध्ये बसलेला देवांश दुसऱ्या बाजूला फेकला गेल्यामुळे त्याला किरकोळ दुखापत झाली. त्याच्यावर डोंबिवलीतील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अपघातात एकाच कुटुंबातील तिघांवर काळाने घाला (Dombivali Truck Accident Kills Family) घातल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *