मुंबईत इमारत कोसळून तिघांचा मृत्यू, आठजण गंभीर जखमी

गोरेगाव : मुंबईतील गोरेगाव पश्चिम येथे तीन मजली इमारतीचे बांधकाम सुरु असताना कोसळली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेत तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून आठजण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना सकाळी 8.30 वाजता घडली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले असून बचावकार्य सुरु आहे. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली दबलेल्या तीन जणांना बाहेर …

, मुंबईत इमारत कोसळून तिघांचा मृत्यू, आठजण गंभीर जखमी

गोरेगाव : मुंबईतील गोरेगाव पश्चिम येथे तीन मजली इमारतीचे बांधकाम सुरु असताना कोसळली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेत तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून आठजण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना सकाळी 8.30 वाजता घडली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले असून बचावकार्य सुरु आहे.

इमारतीच्या ढिगाऱ्याखाली दबलेल्या तीन जणांना बाहेर काढण्यात एनडीआरएफ आणि अग्निशमन दलाच्या जवानांना यश आलं आहे. तर अजून काहीजण यामध्ये अडकल्याची भीती वर्तवली जात आहे. सध्या एनडीआरफ आणि अग्निशमन दलाच्या जवानांकडून सर्च ऑपरेशन सुरु आहे. जखमी झालेल्यांना सिद्धार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

या इमारतीचे अनधिकृतपणे बांधकाम चालू असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. याबद्दलची तक्रार महापालिकेच्या ऑफिसमध्ये करुनही काही कारवाई केली नाही असा आरोप स्थानिक करत आहेत.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *