राजकीय पक्षांना टीव्हीवर कितीवेळ जाहिरात करता येणार? आयोगाने वेळ ठरवली!

मुंबई : भारतीय निवडणूक आयोगाने राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय (प्रादेशिक) पक्षांना दूरदर्शन आणि आकाशवाणीवर लोकसभा निवडणूक प्रचारासाठी वेळ निश्चित केली आहे. आयोगाने 7 राष्ट्रीय आणि 52 राज्यस्तरीय पक्षांसाठी प्रक्षेपण आणि प्रसारण तास कसे असतील ते आज जाहीर केले. वेळेचे वाटप 2014 लोकसभा निवडणुकांमध्ये संबंधित राजकीय पक्षांना मिळालेल्या जागांनुसार करण्यात आले आहे. राजकीय पक्षांना 520 ते 1 …

Loksabha Election 2019, राजकीय पक्षांना टीव्हीवर कितीवेळ जाहिरात करता येणार? आयोगाने वेळ ठरवली!

मुंबई : भारतीय निवडणूक आयोगाने राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय (प्रादेशिक) पक्षांना दूरदर्शन आणि आकाशवाणीवर लोकसभा निवडणूक प्रचारासाठी वेळ निश्चित केली आहे. आयोगाने 7 राष्ट्रीय आणि 52 राज्यस्तरीय पक्षांसाठी प्रक्षेपण आणि प्रसारण तास कसे असतील ते आज जाहीर केले. वेळेचे वाटप 2014 लोकसभा निवडणुकांमध्ये संबंधित राजकीय पक्षांना मिळालेल्या जागांनुसार करण्यात आले आहे.

राजकीय पक्षांना 520 ते 1 हजार 800 मिनिटांपर्यंतचा प्रचार अवधी

राष्ट्रीय वाहिनीवरील प्रक्षेपण आणि प्रसारणासाठी 7 राष्ट्रीय पक्षांना प्रचारासाठी एकूण 600 मिनिटे, तर प्रादेशिक वाहिनीवर एकूण 900 मिनिटे मिळतील. 52 प्रादेशिक पक्षांना प्रचारासाठी प्रादेशिक वाहिनीवर एकूण 1 हजार 800 मिनिटे, तर राष्ट्रीय वाहिनीवर एकूण 520 मिनिटे मिळणार आहेत.

राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांना दूरदर्शन, आकाशवाणीवर प्रचार करताना त्यांच्या वाट्याला आलेला वेळ लक्षात घ्यावा लागेल. राष्ट्रीय पक्षाला दूरदर्शनवर  प्रचारासाठी  राष्ट्रीय वाहिनीवर टप्प्याटप्प्याने 10 तास मिळतील, तर प्रादेशिक वाहिनीवर 15 तास मिळतील. राज्यस्तरीय पक्षाला प्रादेशिक वाहिनीवरील प्रचारासाठी 30 तास, प्रादेशिक उपग्रह केंद्राचे 8 तास 40 मिनिटे मिळतील.

भाषणाची एक लिखित प्रत दूरदर्शन आणि आकाशवाणी यांच्याकडे देणे आवश्यक

नामनिर्देशनाचा शेवटचा दिवस ते शेवटच्या टप्प्यातील निवडणुका होईपर्यंत पक्षांना दूरदर्शन आणि आकाशवाणीवरुन प्रचार करता येईल. भारतीय निवडणूक आयोगाकडून मान्यता प्राप्त असलेल्या पक्षांना दूरदर्शन किंवा आकाशवाणीवरुन पक्षाचा प्रचार व प्रसार करताना त्या संबंधित माहितीची किंवा भाषणाची एक लिखित प्रत दूरदर्शन आणि आकाशवाणी यांच्याकडे देणे आवश्यक असणार आहे. दूरदर्शन आणि आकाशवाणी यांच्यामार्फत ती माहिती पडताळून पाहिली जाईल. या माहितीमध्ये निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या नियमांविरुद्ध लिखाण असल्यास त्यातील काही वाक्य, संदर्भ किंवा परिच्छेद वगळावे लागतील.

प्रसारभारती महामंडळाचीही मान्यता घ्यावी लागणार

राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय राजकीय पक्षांना दूरदर्शन आणि आकाशवाणीवरुन प्रचार करताना प्रसारभारती महामंडळाला त्यांच्या प्रचारासाठी देण्यात आलेला वेळ, प्रचार साहित्य यांचे वेळापत्रक देणे आवश्यक आहे. तसेच त्यांची याबाबत मान्यताही घ्यावी लागेल. याशिवाय या पक्षांनी देश, जात-धर्म तसेच न्यायालय किंवा व्यक्तीविरोधात टीका करु नये, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *