निवडणुकीआधी दोन दिवस सोशल मीडियावर बंदी

मुंबई: निवडणुकीच्या शेवटच्या 48 तासात सोशल मीडियावर बंदी येणार आहे. निवडणूक आयोग त्याबाबत कायदा करणार आहे. तसं प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगाने मुंबई हायकोर्टात सादर केलं. त्यानंतर हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तींनीही तात्काळ कायदा करण्याचे आदेश निवडणूक आयोगाला दिले. निवडणुकीच्या काळात मतदानाच्या दोन दिवस आधी प्रचार करण्यास बंदी असते. त्यादरम्यान छुपा प्रचार सुरु असतो. मात्र, याच काळात सोशल मीडियावर …

निवडणुकीआधी दोन दिवस सोशल मीडियावर बंदी

मुंबई: निवडणुकीच्या शेवटच्या 48 तासात सोशल मीडियावर बंदी येणार आहे. निवडणूक आयोग त्याबाबत कायदा करणार आहे. तसं प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगाने मुंबई हायकोर्टात सादर केलं. त्यानंतर हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तींनीही तात्काळ कायदा करण्याचे आदेश निवडणूक आयोगाला दिले.

निवडणुकीच्या काळात मतदानाच्या दोन दिवस आधी प्रचार करण्यास बंदी असते. त्यादरम्यान छुपा प्रचार सुरु असतो. मात्र, याच काळात सोशल मीडियावर खुल्या प्रमाणात प्रचार-अपप्रचार होत असतो. हे रोखण्यासाठी निवडणूक आयोगाने कलम 126 मध्ये बदल करुन, त्यामध्ये सोशल मीडियाच्या बंदीचं कलम जोडावे अशी मागणी करणारी याचिका मुंबई हायकोर्टात दाखल झाली आहे.

या याचिकेवर उत्तर दाखल करताना निवडणूक आयोगाने शेवटच्या 48 तासात सोशल मीडियावर बंदी आणणाऱ्या कलमाचा समावेश करु, असं मान्य केलं. तर कायदा होण्याची वाट न बघता आपण स्वतंत्र विभाग आहात, आपण ते करु शकता. तुम्ही बंदीबाबत तात्काळ निर्णय घ्या, असे आदेश मुख्य न्यायमूर्तींनी दिले.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *