फेक अकाऊंट ओळखण्यासाठी फेसबुक करणार पत्रकारांची भरती

मुंबई: जगातील सर्वात मोठं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म अशी ओळख असणाऱ्या फेसबुकवर लाखो बनावट अकाऊंट असल्याचे वारंवार समोर येतं. गेल्यावर्षी फेसबुकने 58 कोटी 30 लाख बनावट अकाऊंट बंद केले होते. पण त्यानंतरही अद्याप फेसबुकवर लाखो बनावट अकाऊंट सुरु आहेत. या अकाऊंटद्वारे अनेकदा खोट्या बातम्या पसरवल्या जातात. भविष्यात अशा खोट्या बातम्या पसरवल्या जाऊ नये, यासाठी फेसबुकद्वारे लवकरच […]

फेक अकाऊंट ओळखण्यासाठी फेसबुक करणार पत्रकारांची भरती
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:06 PM

मुंबई: जगातील सर्वात मोठं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म अशी ओळख असणाऱ्या फेसबुकवर लाखो बनावट अकाऊंट असल्याचे वारंवार समोर येतं. गेल्यावर्षी फेसबुकने 58 कोटी 30 लाख बनावट अकाऊंट बंद केले होते. पण त्यानंतरही अद्याप फेसबुकवर लाखो बनावट अकाऊंट सुरु आहेत. या अकाऊंटद्वारे अनेकदा खोट्या बातम्या पसरवल्या जातात. भविष्यात अशा खोट्या बातम्या पसरवल्या जाऊ नये, यासाठी फेसबुकद्वारे लवकरच पत्रकारांची भरती करण्यात येणार आहे. या कामाचा पत्रकारांना पगारही मिळणार आहे.

काही दिवसांपूर्वी फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग हे युरोपमधील एक्सेल स्प्रिंगर या उद्योगाच्या सीईओ मैथिएस डॉफ्नर यांच्याशी चर्चा केली होती. यावेळी डॉफ्नर यांनी जगभरात फेसबुकवर दोन अरब युर्जस आहेत. या सर्व लोकांपर्यंत गुणवत्तापूर्ण बातम्या पोहोचवण्यासाठी काय करता येऊ शकतं असा प्रश्न झुकरबर्ग यांना विचारला होता.

त्यावेळी उत्तर देताना मार्क झुकरबर्ग यांनी ‘मला कल्पना नाही की फेसबुकवर किती बनावट अकाऊंट आहे. पण ही संख्या फार मोठी आहे. काही लोकांनी सांगितल्याप्रमाणे ही संख्या 70 करोड इतकी आहे. असं सांगितलं होते. त्याशिवाय फेसबुकवर फेक अकाऊंट ही गंभीर समस्या आहे. या समस्येवर लवकरच तोडगा काढला पाहिजे असेही झुकरबर्ग यांनी म्हटले होते.

दरम्यान या समस्येवर पत्रकार, जनसंपर्क अधिकारी, जागतिक बातम्या हा एकमेव तोडगा आहे. कारण पत्रकारांना खऱ्या व खोट्या बातम्या, फेक अकाऊंट याचा फरक लगेच ओळखता येतो. त्यामुळे हे काम पत्रकार, जनसंपर्क अधिकारी आणि जागतिक नेटवर्क कंपन्यांना देणार असल्याचं मार्क झुकरबर्ग यांनी सांगितले. पण याबाबत भरती करताना काही अटी व शर्ती ठेवल्या आहे.

फेसबुकला सध्या भेडसावत असणाऱ्या फेक अकाऊंटच्या समस्येबाबत तोडगा काढणारे पत्रकार हे नवीन पिढीतील असेल पाहिजे. नव्या पिढीतील म्हणजेच ज्यांना तंत्रज्ञान, फेसबुक, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, स्मार्टफोन आणि इंटरनेट याबाबतची संपूर्ण कल्पना असेल. तसेच त्यांच्यात खऱ्या आणि खोट्या अकाऊंट ओळखण्याची शैली असेल.

कामाचे स्वरुप

दरम्यान येथे पत्रकारांना कोणत्याही प्रकारची बातमी द्यावी लागणार आहे. या ठिकाणी पत्रकारांचे काम हे फक्त अफवांची पडताळणी करण असणार आहे. बातमी खोटी आढळल्यास पत्रकार त्याचा सत्य रिपोर्ट देतील. तसेच खोट्या बातम्या पसरवणारं अकाऊंट फेक असल्यास त्याचीही सर्व माहिती गोळा करावी लागेल. विशेष म्हणजे या कामाचा पत्रकारांना योग्य तो मोबदला ही दिला जाईल.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.