हॉटेलमध्ये वापरलेल्या फेकण्यायोग्य तेलातून फरसाण आणि वेफर्स

नवी मुंबईतील हा किळसवाणा प्रकार आहे. हॉटेलमध्ये वापरुन फेकण्यायोग्य झालेलं काळं तेल हे पदार्थ तयार करण्यासाठी वापरलं जात होतं. एका तरुणाने हा सर्व प्रकार समोर आणला. या घाणेरड्या तेलात तळलेले पदार्थ किरकोळ विक्रेत्यांमार्फत विकले जात होते.

हॉटेलमध्ये वापरलेल्या फेकण्यायोग्य तेलातून फरसाण आणि वेफर्स

नवी मुंबई : भूक लागल्यानंतर घाईघाईत खाता येईल असा पदार्थ म्हणजे पॅकिंग असलेले शेव, वेफर्स, फरसाण.. पण हे पदार्थ कसे बनवले जातात याचा एक व्हिडीओ समोर आलाय. नवी मुंबईतील हा किळसवाणा प्रकार आहे. हॉटेलमध्ये वापरुन फेकण्यायोग्य झालेलं काळं तेल हे पदार्थ तयार करण्यासाठी वापरलं जात होतं. एका तरुणाने हा सर्व प्रकार समोर आणला. या घाणेरड्या तेलात तळलेले पदार्थ किरकोळ विक्रेत्यांमार्फत विकले जात होते.

शहरातील हॉटेलमधून वापरण्यात आलेलं खाद्य तेल जमा करून त्या तेलात विशिष्ट केमिकल टाकून प्रक्रिया केली जायची. त्या तेलात फरसाण बनवून दुकानदारांना विकलं जातं. या जळालेल्या तेलातच फरसाण, चकली, वेफर्स, शेव, चिवडा, गाठीया, फाफडा असे अनेक प्रकार बनवतात आणि त्या खाद्य पदार्थाचा पुरवठा किरकोळ विक्री करणाऱ्या दुकानदारांना केला जातो. नवी मुंबईतील ऐरोली जवळील गोठीवली गावात हा प्रकार सुरू असताना एका तरुणाच्या लक्षात आलं आणि त्याने पर्दाफाश केलाय. नयन म्हात्रे या तरुणाने मोबाईलच्या कॅमेऱ्यात सर्व प्रकार कैद केला आणि पोलिसांना माहिती दिली.

नयन हा फरसाण बनवणाऱ्या दुकानाच्या आतल्या रूममध्ये गेल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. ज्या टेम्पोतून या तेलाची आयात होत होती, तो टेम्पोही बिनधास्तपणे सप्लाय करत होता. या तेलाच्या डब्यांना सील नव्हतं. घाणेरड्या कपड्याने या डब्यांचं तोंड बंद करण्यात आलेलं होतं. हा सर्व प्रकार तरुणाने रबाळे पोलिसांना सांगितला. मात्र पोलिसांनी फारसं सहकार्य न केल्याने अन्न आणि प्रशासन विभागाला सांगताच त्यांनी कारवाईचा बडगा उगारून सर्व खाद्य पदार्थ आणि तेलाचे सॅम्पल तपासणीसाठी घेऊन गेले. अहवाल येईपर्यंत खाद्यपदार्थांची विक्री बंद करण्यात आली आहे.

ट्रेनमध्ये, बस स्टँडवर किंवा इतर सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही अधिकृत कंपनीचा टॅग किंवा लोगो नसलेल्या पॅकेट्समध्ये वेफर्स, फरसाण या पदार्थांची विक्री केली जाते. पण ब्रँडकडे न पाहता पदार्थ घेणं किती महागात पडू शकतं याचा उदाहरण नवी मुंबईत समोर आलंय. त्यामुळे कोणताही पॅकिंग पदार्थ खाण्यापूर्वी त्यावर संबंधित प्राधिकरणाने प्रमाणित केलेला मार्क आहे किंवा नाही याची खात्री करा आणि मगच खरेदी करा.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *