कोलगेट आणि सेन्सोडाईनवर एफडीएची कारवाई, चार कोटींचा साठा जप्त

ठाणे :  कोलगेट आणि सेन्सोडाईन कंपनीवर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) कारवाई करत सुमारे चार कोटींचा साठा जप्त केला आहे. वैद्यकीय दावा करुन लोकांची दिशाभूल केल्याप्रकरणी प्रशासनाने ही मोठी कारवाई केली आहे. सेन्सोडाईन आणि कोलगेट या कंपन्यांकडे सौंदर्य प्रसाधनांचा परवाना आहे. परंतु, त्यांनी काही दिशाभूल करणारे दावे केले आहेत. त्यानुसार, एफडीएने त्यांच्यावर ही कारवाई केली. सौंदर्य …

कोलगेट आणि सेन्सोडाईनवर एफडीएची कारवाई, चार कोटींचा साठा जप्त

ठाणे :  कोलगेट आणि सेन्सोडाईन कंपनीवर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) कारवाई करत सुमारे चार कोटींचा साठा जप्त केला आहे. वैद्यकीय दावा करुन लोकांची दिशाभूल केल्याप्रकरणी प्रशासनाने ही मोठी कारवाई केली आहे. सेन्सोडाईन आणि कोलगेट या कंपन्यांकडे सौंदर्य प्रसाधनांचा परवाना आहे. परंतु, त्यांनी काही दिशाभूल करणारे दावे केले आहेत. त्यानुसार, एफडीएने त्यांच्यावर ही कारवाई केली.

सौंदर्य प्रसाधनांच्या लेबलवर ग्राहकांची दिशाभूल करणारा दावा उत्पादन कंपन्यांनी नमूद करणे हा कायद्याने गुन्हा आहे. परंतु, मे. ग्लॅक्सो स्मिथलाईन कन्झ्युमर हेल्थ लिमिटेड कंपनीच्या सेन्सोडाईन आणि मे. कोलगेट पॉमोलिव्ह इंडिया लिमिटेडच्या कोलगेट उत्पादनांवर दिशाभूल करणारा दावा छापण्यात आला होता. यावर एफडीएने कारवाई करत तब्बल चार कोटी 69 लाख 30 हजार 768 रुपयांचा साठा जप्त केला आहे.

रिपेअर अ‍ॅण्ड प्रोटेक्ट, क्लीनिकली प्रुव्हन रिलीफ अ‍ॅण्ड डेली प्रोटेक्शन फॉर सेन्सिटिव्ह टिथ आणि 24/7 सेन्सिटिव्हीटी प्रोटेक्शन/क्लीनिकली प्रुव्हन रिलीफ असा दावा या दोन्ही कंपन्यांनी त्यांच्या सौंदर्य प्रसाधनांवर छापला होता. यामुळे ग्राहकांची दिशाभूल करण्यात आल्याचा आरोप एफडीएने कंपन्यांवर केला. भिवंडीतील कारवाईवेळी मे. ग्लॅक्सो स्मिथलाईन कन्झ्युमर हेल्थ लिमिटेड कंपनीकडे सेन्सोडाईन विथ फ्लोराईड टूथपेस्ट, सेन्सोडाईन फ्लोराईड टूथपेस्ट आणि फ्रेश जेल या उत्पादनांचा साठा आढळून आला. त्यांच्याकडून चार कोटी 27 लाख 44 हजार 762 रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. मे. कोलगेट पॉमोलिव्ह इंडिया लिमिटेड कंपनीकडे कोलगेट अ‍ॅण्टीकॅव्हिटी टूथपेस्ट, सेन्सिटिव्ह या उत्पादनाचा साठा आढळून आला. यावेळी त्यांच्याकडून 41 लाख 86 हजार 6 रुपयांचा साठा जप्त करण्यात आला.औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा 1940 आणि नियमांतर्गत कलम 18(ए)(2) आणि कलम 17- सी (सी) चे उल्लंघन केल्याप्रकरणी कंपन्यांवर कारवाई करण्यात येईल.

“एफडीएने चांगली कारवाई केली आहे.  उत्पादनांवर चुकीचा दावा करु नये. दाव्यांमध्ये कोणत्याही प्रकारचे तथ्य नसलेले मजकूर छापणे गैर आहे. औषध व सौंदर्य कायद्याची मान्यता मिळाल्यावरच एखाद्या उत्पादनावर दावा करता येतो. परंतु, कारवाई केलेल्या उत्पादनांवर औषध व सौंदर्य कायद्याची मान्यता नसतानाही दावा केला. त्यामुळे ग्राहकांची फसवणूक झाली”, अशी माहिती एफडीएच्या सहआयुक्तांनी दिली.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *